HW News Marathi
महाराष्ट्र

सांगली -मिरज- कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान

सांगली | सांगली -मिरज- कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सांगली, मिरज, कुपवाडच्या ७८ तर जळगावच्या ७५ जागा अशा दोन्ही महानगरपालिकांच्या एकूण १५३ जागांसाठी ७५४ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

सकाळी ७.३० वाजल्यापासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत हे मतदान सुरु रहाणार आहे. तर शुक्रवार ३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दोन्ही महानगरपालिकेत मिळून सात लाख ८९ हजार २५१ मतदार आहेत. त्यामुळे मतदानासाठी १०१३ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे.

सदर निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून ५ हजार ७९२ अधिकारी, कर्मचारी नेमण्यात आले आहेत. कायदा आणि सुव्यस्था राखण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

सांगली- मिरज – कुपवाड महापालिका

  • एकूण प्रभाग – ४०
  • जागा-७८
  • उमेदवार-४१५
  • मतदार ४ लाख २४ हजार १७९
  • मतदान केंद्रे- ५४४

जळगाव महापालिका

  • एकूण प्रभाग- १९
  • जागा-७५
  • उमेदवार- ३०३
  • मतदार- ३ लाख ६५ हजार ७२
  • मतदान केंद्रे- ४६९
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाशिकमध्ये भाजपच्या ‘या’ नेत्याने घेतली राज ठाकरेंची भेट!

News Desk

“चोरीचा माल विकत घेणं हा सुद्धा गुन्हा,” अजित पवारांनी पत्र चोरल्याच्या आरोपाला संजय राऊतांचं भाजपला प्रत्युत्तर 

News Desk

सीताराम कुंटे यांची प्रधान सल्लागारपदी नियुक्ती

News Desk