HW News Marathi
महाराष्ट्र

सत्तार यांनी भाजप प्रवेशाबद्दल इच्छाच व्यक्त केली नाही ! 

मुंबई | “अब्दुल सत्तार यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याबद्दल इच्छाच व्यक्त केली नाही”, असा खळबळजनक खुलासा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि जालन्याचे नवनिर्वाचित खासदार रावसाहेब दानवे यांनी केले आहे. एकीकडे काहीच दिवसांपूर्वी, मी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असून शंंभर टक्के मंत्री होणार असल्याचा दावा काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी केला होता. तर, दुसरीकडे रावसाहेब दानवे यांनी केलेल्या या विधानामुळे आता अब्दुल सत्तार यांच्या भाजप प्रवेशाबद्दल मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

काँग्रेसने औरंगाबादमधून सुभाष झांबड यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिल्याने नाराज नेते अब्दुल सत्तार यांनी २३ मार्च रोजी मध्यरात्री मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान सत्तार यांच्या मुख्यमंत्र्यांसह जलसंपदा मंत्री गिरीश महाजन देखील उपस्थित होते. दरम्यान, सत्तार यांच्या भाजप प्रवेशास भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा नकार आहे. काँग्रेसकडून औरंगाबाद मतदारसंघातून आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर झाल्याने नाराज असलेले अब्दुल सत्तार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची देखील माहिती मिळत होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात भीषण आग, कारण अद्याप अस्पष्ट

News Desk

‘ठाकरे सरकारचा निर्णय शेतकऱ्यांसाठी घातक’, राजू शेट्टींचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांनी बोलावले बैठकीला!

News Desk

‘पार्थ लंबी रेस का घोडा,मित्रा थांबू नकोस’ नितेश राणे धावले पार्थ पवारांच्या मदतीला…

News Desk