HW News Marathi
Covid-19

शिवसेना नगरसेविका काळाच्या पडद्याआड, रणरागिणी सत्यभामा गाडेकर यांचं कोरोनाने निधन

नाशिक | शिवसेना नगरसेविका सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांचं निधन झालं आहे. कोरोनावरील उपचारादरम्यान गाडेकर यांची प्राणज्योत मालवली. गाडेकर यांनी शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख म्हणून अनेक वर्ष धुरा सांभाळली आहे.

सत्यभामा गाडेकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सत्यभामा गाडेकर कोरोना काळातही जनतेसाठी झोकून देऊन काम करत होत्या. जनसेवा करतानाच अखेर गाडेकरांनाही कोरोनाने गाठले. त्यांच्या निधनाने शिवसैनिकांना जबरदस्त धक्का बसला आहे.

कोण आहेत सत्यभामा गाडेकर?

सत्यभामा गाडेकर यांनी नाशिक महापालिकेत नगरसेवकपद भूषवले आहे. नाशिक महापालिका स्थायी समितीच्याही त्या सदस्या होत्या. गाडेकर शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख होत्या. त्यांच्या निधनाने महिला आघाडीला मोठा धक्का बसला असून मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सीएम केअर फंडातील निधी मजूरांच्या रेल्वे तिकिटासाठी वापरण्यात येणार

News Desk

ठाकरे सरकारने आज घेतले ३ अत्यंत महत्त्वाचे निर्णय

News Desk

कोरोनासह म्युकर मायकोसिसच्या उपचारासाठी निधी कमी पडू देणार नाही – अजित पवार

News Desk