HW News Marathi
Covid-19

प्राथमिक शाळांना हिरवा कंदील ; ICMR ने दिली महत्वचाही माहिती

मुंबई | कोरोनाच्या पारेश्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालय बंद करण्यात आले होते. सलग दोन वर्ष शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. तिसऱ्या लाटेची धोका असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक मोठी घोषणा केली आहे. “मुले व्हायरल इन्फेक्शनचा सामना अधिक चांगल्या प्रकारे करु शकतात त्यामुळे आधी प्राथमिक शाळा पुन्हा सुरू करण्यावर विचार करणे योग्य ठरेल ,असे मत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं व्यक्त केलं आहे.

मुलांसह दोन तृतीयांश नागरिकांमध्ये करोनाविरोधातील अ‍ॅण्टीबॉडीज विकसित

देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अजूनही तळलेला नाही. यातच आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आज चौथ्या राष्ट्रीय सेरोसर्वेचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले. यामध्ये सांगण्यात आहे की, देसभरात मुलांसह दोन तृतीयांश नागरिकांमध्ये करोनाविरोधातील अ‍ॅण्टीबॉडीज विकसित झाल्या आहेत. या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की ६ ते १७ वयोगटातील ५० टक्क्यांहून अधिक मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला व त्यांच्यामध्ये अ‍ॅण्टीबॉडीज विकसित झाल्या आहेत.

शाळा लवकरच सुरु?

कोरोना लहान मुलां मध्ये पसरून त्यांना काही त्रास होऊ नये म्हणून सरकार ने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीसुनार, कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असताना आता मुलांना लवकरच शाळेत पाठविले जाऊ शकते. असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. भारतीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ बलराम भार्गव म्हणाले की, “मुलांमध्ये अ‍ॅण्टीबॉडीजचे प्रमान जास्त आहे. तसेच प्रौढांपेक्षा मुले या संसर्गाचा सामना चांगल्या प्रकारे करू शकतात, असे आढळले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांना शाळेत पाठविले जाऊ शकते”, ही महत्वाची माहिती त्यांनी सांगितली आहे.

सर्वेचा अहवाल

सर्वे जून – जुलै दरम्यान करण्यात आला होता. २८ हजार ९७५ लोकांवर केल्या गेलेल्या सर्वेत ६ ते १७ वर्षे वयोगटतील मुलांचा देखील समावेश करण्यात आला होता. सर्वेमध्ये सहभागी ६७.६ टक्के लोकांमध्ये कोविड अ‍ॅण्टीबॉडी आढळून आल्या आहेत, म्हणजेच ते करोना संक्रमीत झाले होते.

या सर्वेमध्ये २८ हजार ९७५ लोकांना सहभागी करून घेतलं गेलं होतं. यामध्ये ६ ते ९ वर्ष वयोगटातील २ हजार ८९२ मुलं, १० ते १७ वयोगटातील ५ हजार ७९९ मुलं आणि १८ वर्षा पेक्षा जास्त वय असणाऱ्या २० हजार २८४ जणांचा समावेश होता.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर किती परिणाम होणार?

News Desk

हे सरकार नतद्रष्ट, सगळे तोंडावर पडले ! विनायक मेटेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

News Desk

खुशखबर ! मुंबईत ५ ऑगस्टपासून सर्व दुकानच सुरु करण्यास परवानगी

News Desk