HW News Marathi
महाराष्ट्र

SEBC प्रवर्गातील उमेदवारांना EWS प्रवर्गातून भरती प्रक्रियेत सहभागी करुन घेण्याचा निर्णय

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरुन रखडलेल्या उर्जा विभागातील भरती प्रक्रियेचा मार्ग आता मोकळा होण्याची शक्यता आहे. कारण SEBC प्रवर्गातील उमेदवारांना आता EWS प्रवर्गातून भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. तसे परिपत्रक ऊर्जा विभागानं काढले आहे. SEBC प्रवर्गातील उमेदवारांना वगळून ही भरती केली जाणार होती. मात्र, त्याला मराठा समाजाने तीव्र विरोध केलाय. अखेर SEBC प्रवर्गातील उमेदवारांना EWS प्रवर्गातून या भरती प्रक्रियेत सहभागी करुन घेण्याचा निर्णय ऊर्जा विभागानं घेतला आहे. ऊर्जा विभागातील अभियंता पदासाठी ३ जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या.

महावितरणच्या भरती प्रक्रियेत SEBCच्या उमेदवारांनाही सामावून घ्या,अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली होती. मात्र, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या आदेशानुसार स्थापत्य अभियंता, विद्युत साहाय्यक आणि विद्युत साहाय्यक या पदांच्या भरतीमध्ये एसईबीसी प्रवर्गाच्या जागा राखीव ठेवण्यात येणार होत्या. मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात खटला सुरु आहे. सुप्रीम कोर्टाने याबाबत अंतिम निर्णय दिल्यावर या एसईबीसीच्या जागांची भरती केली जाईल, असं महावितरणाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. ऊर्जा विभागाच्या याच निर्णयावर संभाजीराजे यांनी नितीन राऊत यांना पत्र पाठवत याबाबत खुलासादेखील मागवण्यात आला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘एखादा शूटर लावून मला मारून टाका’ जळगावात सेनेच्या आमदाराची थेट खडसेंकडे मागणी

News Desk

बाबरी मशीद खटल्याचा निकाल धक्कादायक असून वस्तुस्थितीला धरून नाहीः हुसेन दलवाई

News Desk

महाराष्ट्र पोलीस अकादमी येथील विविध प्रकल्पांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार उद्घाटन!

News Desk