HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, ‘या’ मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही चिरंजीवांना तिकीट

मुंबई। विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती झाली असून काल (१ ऑक्टोबर) दोन्ही पक्षांच्या पहिली यादी जाहीर झाली. यानंतर काँग्रेसने दुसरी यादी काल रात्री जाहीर केली. काँग्रेसने ५२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. कॉंग्रेसने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत ५२ उमेदवारांचा समावेश आहे. या यादीमध्ये दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख यांना उमेदवारी मिळाली आहे.

काँग्रेसच्या दुसऱ्या यादीतही दिग्गजांना स्थान देण्यात आले आहे. दुसऱ्या यादीमध्ये कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सांगलीतून पृथ्वीराज पाटील निवडणुकांच्या रणांगणात उतरवले आहे. तसेच पहिल्या यादीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, प्रणिती शिंदे यांच्या नावाचा समावेश होता. दरम्यान कॉंग्रेसने आतापर्यंत एकूण १०३ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. पहिल्या यादीत ५१ आणि दुसर्या यादीत ५२ नावांचा समावेश आहे. आता इतर उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होणार आहे.

कॉंग्रेसच्या दुसऱ्या यादीतील उमेदवार

  • कुणाल पाटील – धुळे ग्रामीण
  • राजेश एकाडे – मलकापूर
  • राहुल बोंद्रे – चिखली
  • स्वाती वाकेकर – जळगाव (जामोड)
  • संजय बोडके – अकोट
  • विवेक पारस्कर – अकोला पूर्व
  • रजनी राठोड – वाशिम
  • अनिरुद्ध देशमुख – अचलपूर
  • शेखर शेंडे – वर्धा
  • राजू परवे – उमरेड
  • गिरिश पांडव – नागपूर (दक्षिण)
  • विकास ठाकरे – नागपूर (पश्चिम)
  • सहसराम कारोटे – आमगाव
  • आनंदराव गेडाम – आरमुरी
  • डॉ. चंदा कोडावते – गडचिरोली
  • सुभाष धोटे – राजुरा
  • विश्वास झाडे – बल्लारपूर
  • वामनराव कासावार – वणी
  • वसंत पुर्के – राळेगाव
  • शिवाजीराव मोघे – आर्णी
  • विजय खडसे – उंबरखेड
  • भाऊराव पाटील – हिंगोली
  • सुरेशकुमार जेठालिया – परतूर
  • किसनराव गोरंटियाल – जालना
  • डॉ. तुषार शेवाळे – मालेगाव (बाह्य)
  • शिरिषकुमार कोतवाल – चांदवड
  • हिरामण खोसकर – इगतपुरी
  • शोएब अश्फाख उर्फ गुड्डू – भिवंडी (पश्चिम)
  • कांचन कुलकर्णी – कल्याण (पश्चिम)
  • राधिका गुप्ते – डोंबिवली
  • कुमार खिलारे – बोरिवली
  • अरविंद सावंत – दहिसर
  • गोविंद सिंग – मुलुंड
  • सुनिल कुमरे – जोगेश्वरी (पूर्व)
  • अजंता यादव – कांदिवली (पूर्व)
  • कालू करमनभाई बुधेलिया – चारकोप
  • युवराज मोहिते – गोरेगाव
  • जगदीश आमीन – अंधेरी (पूर्व)
  • जयंती सिरोया – विलेपार्ले
  • प्रविण नाईक – माहिम
  • उदय फणसेकर – शिवडी
  • हिरा देवासी – मलबारहिल
  • डॉ. मनिष पाटील – उरण
  • नंदा म्हात्रे – पेण
  • दत्तात्रय बहिरत – शिवाजीनगर
  • अरविंद शिंदे – कसबा पेठ
  • धीरज देशमुख – लातूर ग्रामीण
  • दिलीप भालेराव – उमरगाव
  • पृथ्वीराज चव्हाण – कराड (दक्षिण)
  • अविनाश लाड – राजापूर
  • राहुल खंजिरे – इचलकरंजी
  • पृथ्वीराज पाटील – सांगली
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जवळपास १० महिन्यांंनंतर शाळेची घंटा वाजली, ५वी-८वीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग भरण्यास आजपासून सुरुवात

News Desk

5 कोटी द्या! नाही तर तुमची बदनामी करेन, धनंजय मुंडेंची महिलेविरोधात तक्रार दाखल

Aprna

विजयादशमीला शस्त्रपूजन करणारच | संघ

Gauri Tilekar