HW News Marathi
महाराष्ट्र

पालघरमध्ये जिल्हा परिषदेच्या दोन गटात सेनेचे उमेदवार विजयी!

मुंबई। पालघर जिल्हापरिषद पंचायत समिती पोट निवडणुकीत 29 जागांसाठी काल (5 ऑक्टोबर) मतदान पार पडलं. यावेळी पालघर जिल्ह्यात 69.15% मतदान झालं होतं. 144 उमेदवार या पोटनिवडणुकीत आपलं नशीब आजमावत आहेत. जिल्हा परिषदच्या 15 तर पंचायत समिती 14 अशा 29 जागा आहेत. 15 जिल्हा परिषदेच्या जागांपैकी डहाणू तालुक्यातील वणई जिल्हा परिषद गट हे राज्याचे लक्ष वेधून घेत आहेत.

पालघरच्या जिल्हा परिषदच्या दुसऱ्या गटात देखील शिवसेनेचा विजय, शिवसेनेच्या उमेदवार नीता पाटील विजयी

पालघर जिल्हा परिषद गट सावरे एम्बुर येथून शिवसेना उमेदवार विनया पाटील विजयी

वणई गटात सध्याचे शिवसेनेचे खा. राजेंद्र गावित यांनी कट्टर शिवसैनिकांना डावलून आपला राजकीय वारसदार म्हणून स्वत:चा मुलगा रोहित याला शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात उतरवलं होतं. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर होता. तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, मनसे यांनी ही आपला उमेदवार देऊन प्रतिष्ठा पणाला लावली.पोटनिवडणुकीअगोदर पालघर जिल्हा परिषदमध्ये एकूण 57 सदस्य आहेत. सध्या जिल्हा परिषद अध्यक्ष पद हे शिवसेनेकडे आहे. तर उपाध्यक्षपद हे राष्ट्रवादीकडे आहे. पालघर जिल्हा परिषदवर सध्या महाविकास आघाडीची सत्ता आहे.

शिवसेना -18

राष्ट्रवादी – 5

काँग्रेस – 1

कम्युनिस्ट – 05

बहुजन विकास आघाडी – 04

भाजप – 12

अपक्ष – 02

एकूण 57

सर्वाधिक फटका राष्ट्रवादीला

ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने या जागा रिक्त झाल्या असून याचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीला बसलेला पाहायला मिळाला . राष्ट्रवादीच्या 15 पैकी 7 जागा रद्द झाल्या असून शिवसेना 3, भाजप 4 तर माकपची एक जागा रद्द झाली होती.जिल्हा परिषदेत सध्या महाविकास आघाडी सत्तेत असून शिवसेनेकडे अध्यक्ष तर राष्ट्रवादी कडे उपाध्यक्षपद आहे . जिल्हा परिषदेत एकूण 57 जागा असून बहुमतासाठी 29 जागांची गरज आहे. या पोटनिवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाच्या जागा कमी जास्त झाल्या तरी जिल्हा परिषदेतील सत्तेत फरक पडणार नसला तरी महाविकास आघाडीत फूट पडल्यास येथे सत्ता बदलण्याची शक्यता आहे.

काँग्रेसला एका जागेवर विजय मिळवण्यात यश

सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेकडे 18, राष्ट्रवादी काँग्रेस 15, भाजप 12, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 5, बहुजन विकास आघाडी 4 अपक्ष 3 तर काँग्रेसला एका जागेवर विजय मिळवण्यात यश आलं होतं. सध्याच्या पोटनिवडणुकीत बहुतांशी जागांवर सेना भाजप आणि राष्ट्रवादी आणि बहुजन विकास आघाडी अशी चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे.मात्र असं असलं तरी शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांचे चिरंजीव रोहित गावित पहिल्यांदा वणई गटातून निवडणूक लढवत असल्याने गावितांसह सर्वच राजकीय पक्षांसाठी या गटाची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. गावितांना आणि शिवसेनेला शह देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी या गटात संपूर्ण ताकद लावली असून शिवसेनेचा एक गट गावितांशी नाराज असल्याने त्याचा फटका रोहित गावित यांना बसण्याची शक्यता दर्शवली जात आहे. वणई या गटात सेना -भाजपा – काँग्रेस – बहुजन विकास आघाडी अशी चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांचंही नाव कोपर्डी बलात्कार प्रकरणी साक्षीदारांच्या यादीत

News Desk

या देशात भाजप समर्थकांना सात खून माफ आहेत का? – नवाब मलिक

News Desk

वानखेडेंसह नवाब मलिकांचीही न्यायालयीन चौकशी करा, प्रसाद लाड यांची मागणी

News Desk