HW News Marathi
महाराष्ट्र

अस्तित्वात नसलेल्या गावांना खासदार खैरेंचा निधी – शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव

  • जिल्हाधिकाऱ्यांना दिलं चौकशी करण्याची मागणी करणारं पत्र
  • ती तीन गावं दाखवल्यास एक लाखाच बक्षीस

औरंगाबाद – औरंगाबादचे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांचा खासदार निधी कन्नड तालुक्यातील तीन गावांना देण्यात आला आहे. मात्र, ही तीन गावच कन्नड तालुक्यात नसल्याचं स्थानिक शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांचं म्हणणं आहे. याविरोधात आमदार जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे चौकशीची मागणी केलीय.

खासदार चंद्रकात खैरे हे गेल्या 20 वर्षांपासून औरंगाबादचे खासदार आहेत. त्यामुळं त्यांना औरंगाबाद मतदारसंघातील गावांची चांगलीच ओळख आहे. अशा परिस्थितीत त्यांनी कन्नड तालुक्यातील सावरखेडा, खापेश्वर, झाडेगाव तांडा या तीन गावात खासदार निधी वितरीत केला, पण ही गावच कन्नड तालुक्यात नसल्याची माहिती शिवसेनेचे स्थानिक आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिलीय. ही तिन्ही गावं कुणी कन्नड तालुक्यात दाखवणाऱ्यास एक लाख रूपयांचं बक्षीसही आमदार जाधव यांनी घोषित केलंय.

खासदार निधी खर्च करण्याचे काही निकष आहेत. त्यामुळे अस्तित्वात नसलेल्या गावात कामं झाली कशी, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा रिपोर्ट दिला कसा, कामच न करता त्याचे पैसे कसे उचलले, एकाच कंत्राटदाराला सर्व कामं का देण्यात आली आणि याची चौकशी होण्याची गरज आहे, त्याबाबत आमदार जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिल्याचं समजत.

प्रत्येक वर्षी खासदाराला 5 कोटींचा निधी मिळतोय निधीमध्ये मतदार संघातील कोणती कामं करायची त्याची निवड करण्याचे अधिकार खासदारांना असतात. एखाद्या मजूर सोसायटीला काम देण्याची शिफारस खासदार करु शकतात. याबाबतचं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना जातं. पुढे जिल्हाधिकारी नियोजन कार्यालयाला पत्र पाठवतात हा निधी खर्च करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असते. त्यासाठी बांधकाम विभागाकडून संबंधित कामाच्या देखरेखीसाठी एका अभियंत्याची नियुती केली जाते. अभियंत्याच्या अहवालानंतर पैसे कंत्राटदाराच्या खात्यात जमा होतात. इतक्या मोठ्या प्रशासकीय यंत्रणेच्या डोळ्यांतून अस्तित्वात नसलेली गावं सुटलीच कशी, असा प्रश्न उपस्थित होतो. यासंदर्भात खासदार खैरे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, ते बैठकीत असल्याचं उत्तर त्यांच्या स्वीय सहायकांनी दिलं

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांना आलेल्या धमकीची NIA चौकशी करा, मनसेची मागणी!

News Desk

दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनातही भाजप आक्रमक राहणार!

News Desk

भाजपकडून डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेची उमेदवारी

swarit