HW News Marathi
महाराष्ट्र

लोक पक्ष सोडून जावे अशी वागूण दिली जाते, खडसेंचे भाजपवर खळबळजनक आरोप

परळी | “पंकजावर माझ्यासारखी वेळ येऊ नये, जर तशी वेळ पंकजांवर आली तर त्या एकट्या पडणार नाही,” असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडेला दिला आहे. गोपीनाथ गडवरून बोलताना खडसे भाजपवर अनेक खळबळजनक आरोप केले आहे. “पक्षाविरोधात बोलू नका, असे आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत,” असे म्हणत भाजपला टोला लगावला. गोपीनाथ मुंडेंच्या मतदारासंघात पंकजा मुडेंचा पराभव हे सर्वात मोठे दु:ख असल्याचे खडसेंनी सांगितले. पंकजा मुंडेंच्या पराभव हा पक्षांर्त लोकांमुळे झाल्याचे म्हणत पुन्हा एकदा खडसेंनी भाजपवर निशाणा साधला. खडसेंनी गोपीनाथ

पंकजा मुंडेचा पराभव झाला नाही तर पराभव घडवून आला, असे म्हणत भाजपवर टीकास्त्र सोडले. खडसे पुढे म्हणाले की, लोक पक्ष सोडून जावे अशी वागूण दिली जाते, असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी राज्यातील पक्ष नेतृत्वावर केला आहे. गोपीनाथ गडवरून खडसेंनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्ताने आज (१२ डिसेंबर) परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गडावर मुंडे समर्थकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. खडसेंनी गोपीनाथ गडावरून भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली. यावेळी खडसेंनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना देखील उजाळा दिली.

भाजप सरकारच्या काळा गोपीनाथचे स्मारक झाले नाही

त्याचसोबत देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. २३ नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. २६ नोव्हेंबरला राजीनामा दिला. ५ वर्षापूर्वी मी मंत्री असताना गोपीनाथ मुंडे स्मारक उभारण्यासाठी औरंगबाद येथील दुग्धविकास विभागाची जागा मी दिली. गेली ५ वर्ष भाजपा सरकार असून निधी दिला नाही. २४ नोव्हेंबरला स्व. गोपीनाथ मुंडे स्मारकासाठी निधी दिला. २५ नोव्हेंबरला औरंगाबाद येथे कंत्राट निघाले. आणि २६ नोव्हेंबरला राजीनामा दिला. ८० तासांच्या सरकारमध्ये हे सगळे घडले. मग कुणासाठी सीएम झाले होते? त्यासाठी त्यांचे आभार मानतो असा चिमटाही एकनाथ खडसेंनी फडणवीसांना काढला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवस्मारक ठरणार जगातील सर्वात उंच स्मारक

swarit

राज्यपालांच्या भाषणाचा अनुवाद गुजरातीत; मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी

News Desk

‘हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या’ शरजिल उस्मानी विरोधात गुन्हा दाखल करा,भाजपची मागणी

News Desk