HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेस-राष्ट्रवादी थकलेत, भविष्यात दोन्ही पक्ष एकत्र येणार !

मुंबई | “काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रसे थकलेत असून भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार,” असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार यांनी केले आहे. भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विलिननीकरण होणार असल्याचे सुशील कुमार म्हणाले. सुशील कुमार पुढे असे म्हणाल केली, आम्ही एका आईच्या माडीवर खेळून मोठे झालो आहोत. भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याचे संकेत सुशील कुमार यांनी दिले.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघेही थकले आहेत. कधीकाळी आम्ही एका आईच्या मांडीवर वाढलो आहोत. आमच्याही मनात खंत आहे आणि त्यांच्याही (शरद पवारांच्या) मनात खंत असेल, मात्र ते बोलून दाखवत नाहीत. मात्र याची सुरुवात आज सोलापुरातून झाली आहे, असे शिंदे यांनी म्हटले.

विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना शिंदेंनी केलेल वक्तव्याने सर्वांच्या भुवया उचावल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाला गळती लागली होती. पक्षाला बळकटी देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार राज्यभरात दौरे करत आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात इंजिनिअरसह पत्नी, मुलगा मृतावस्थेत

swarit

#Coronavirus : राज्याचा आकडा ४४८३ वर पोहोचला

News Desk

स्वच्छता सुविधा, पंचायतींना अनुदानासाठी सुमारे ९ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी! – हसन मुश्रीफ

News Desk