HW Marathi
महाराष्ट्र मुंबई

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन

सातारा | ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. काल(२१ सप्टेंबर) त्यांना कोरोना असल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांच्या जाण्याने चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. आई माझी काळूबाई या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यासह सेटवरील इतर २७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

साताऱ्यातील लोणंद भागात सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेचे चित्रीकरण सुरु आहे. या मालिकेच्या चित्रीकरणासाठी मुंबईवरुन एक डान्स ग्रुप बोलावण्यात आला होता. त्यांच्यामार्फत सेटवर कोरोनाची लागण झाल्याचे म्हटले जात आहे. त्यानतंर सेटवरील जवळपास २७ जणांना कोरोनाची लागण झाली होती.

Related posts

स्वयंघोषित समन्वयकांना मराठा क्रांती ठोक मोर्चा धडा शिकवणार

Gauri Tilekar

राज्यात कमाल तापमानात वाढ, मुंबईकर हैराण

News Desk

शिवनेरी किल्ल्यावर मद्यपान करणा-या कर्मचा-यांवर गुन्हा दाखल

Ramdas Pandewad