HW News Marathi
महाराष्ट्र

इकबाल मिर्ची मालमता प्रकरण : प्रफुल्ल पटेल चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल

मुंबई | राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना मृत गँगस्टर इक्बाल मिर्ची याची मालमत्ता विकत घेतली. या कथीत व्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) प्रफुल्ल पटेल यांना नोटीस बजावण्यात आली. यानंतर पटेल आज (१८ ऑक्टोबर) ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. वरळीतील सीजे हाउसमधील त्यांच्या मालकीच्या दोन फ्लॅटच्या खरेदी व्यवहाराबाबत त्यांची ईडीच्या दक्षिण मुंबईतील बेलार्ड पियर्ड परिसरातील कार्यालयात चौकशी होईल.

एका बाजुला विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना पटेल यांनी चौकशीसाठी ईडीने बोलविले आहे. पटेल यांच्या चौकशीचे राजकीय वर्तुळात काय पडसात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. सीजे हाउसमधील मिर्चीच्या मालकीच्या दोन फ्लॅट पटेल यांनी विकत घेतल्याचा अधिकाऱ्यांचा संशय आहे. या प्रकरणी अटक केलेल्या रणजीत सिंग बिंद्रा व हरुण युसूफ दलालांच्या चौकशीतून ही माहिती पुढे आली आहे. २००७ मध्ये त्याचा विकास करार होऊन हस्तांतर करण्यात आले. पटेल यांची त्या व्यवहारावर सहमालक म्हणून स्वाक्षरी असल्याचे सांगण्यात येते. त्याबाबत त्यांची चौकशी होईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कोव्हिड काळात मुख्यमंत्र्यांकडून योग्य पद्धतीने नियोजन!”, एकनाथ शिंदेंचं सीटी रवींना प्रत्युत्तर

News Desk

“सात अजुबे इस दुनिया के आठवा माननीय मुख्यमंत्री हैं”,मुनगंटीवारांनी डिवचलं!

News Desk

ही वेळ आणीबाणीची, शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा – राज ठाकरे

News Desk