HW News Marathi
Covid-19

सिरमकडून राज्यांना थेट ४०० रुपयांत तर खासगी रुग्णालयांना ६०० रुपयांत मिळणार कोरोना लस

नवी दिल्ली | देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून, रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाणही वाढत आहेत. यामुळेच केंद्र सरकारने राज्ये आणि खासगी रुग्णालयांना खासगी कंपन्यांकडू थेट कोरोना लस घेण्याची परवानगी दिली होती. या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे नवीन दर जाहीर केले आहेत. राज्य सरकारांना ही लस ४०० रुपयांना तर खासगी रुग्णालयांना ६०० रुपयांत मिळणार आहे. याचवेळी केंद्र सरकारला मात्र, यापुढेही १५० रुपयांतच ही लस मिळणार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालय व अर्थ मंत्रालयाने कोरोना लशीच्या उत्पादनाचा वेग वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणारी पावले उचलली आहेत. याअंतर्गत राज्य सरकारे, खासगी रुग्णालये आणि लसीकरणे केंद्रे थेट कोरोना लशीची खरेदी करु शकतात. पुढील दोन महिन्यांत सिरमने उत्पादन वाढवण्यावर भर देण्याचा निर्मय घेतला आहे. लशीच्या एकूण उत्पादनाच्या ५० टक्के केंद्र सरकारच्या लसीकरण कार्यक्रमाला आणि उरलेले ५० टक्के राज्य सरकारे आणि खासगी रुग्णालयांना देण्यात येणार आहे, असे सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी म्हटले आहे.

 

यासाठी सिरमने पत्रक जाहीर केले आहे. कोव्हिशिल्ड लशीच्या एका डोससाठी राज्यांना ४०० रुपये मोजावे लागतील. याचवेळी खासगी रुग्णालयांना यासाठी ६०० रुपये द्यावे लागतील. पुढील ४ ते ५ महिन्यांत ही लस किरकोळ विक्रीसाठी खुल्या बाजारात उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे, असेही पूनावाला यांनी म्हटले आहे. तसेच, केंद्र सरकारने आता १ मेपासून १८ वर्षांवरील सगळ्यांनाच कोरोना लस घेता येणार असल्याचे जाहीर केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना रुग्ण संख्या, लस वितरण मुद्यावर पंतप्रधानांची राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

News Desk

पुण्यात मोफत छत्र्या दुरुस्त, काँग्रेसचा अनोखा उपक्रम !

News Desk

काँग्रेस नेते राजीव सातव ICU मध्ये, प्रकृती स्थिर; पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू

News Desk