HW News Marathi
Covid-19

पुण्यात मोफत छत्र्या दुरुस्त, काँग्रेसचा अनोखा उपक्रम !

पुणे | पुणेकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतात. असाच एक प्रत्यय पुण्यात पाहायला मिळालाय पुणे तिथे काय उणे! पुण्याच्या याच परंपरेला जोपासत काँग्रेसकडून पुणे शहरात एक अनोखा उपक्रम राबवला आहे. नादुरुस्त छत्र्या मोफत दुरुस्त करण्याची मोहीम काँग्रेसने हाती घेतली आहे. पुणे शहरात अनेक ठिकाणी याची पोस्टर्स लक्ष वेधून घेत आहेत. आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे फोटो नागरिकांसाठी चर्चेचा विषय ठरत आहेत. काही जण कौतुक करतायत तर काहीजण टिका करतायतं.

काँग्रेसचा अनोखा उपक्रम

पावसाळा सुरू झाला की घराबाहेर छत्री घेतल्याशिवाय गत्यंतर नसते. काहीजण नव्या छत्र्या घेतात, तर काहीजण आपला मोर्चा वळवतात त्या जुन्या छत्र्यांकडे, जुन्या छत्र्यांचे कधी कधी ‘काडी-मोड’ झाले असतात, कधी छत्र्यांच्या कापडाला ठिगळ पडलेली असतात. आणि नविन छत्री देखील थोड्याश्या वारा पावसाने कधी तुटेल सांगता येत नाही. म्हणून सारखं नवीन छत्री घेणं परवडत नाही. मोडकीतोडकी छत्री बाहेर घेऊन जायची देखील पंचाईत असते. मग अश्या वेळी करायचं काय, हीच अडचण लक्षात घेत पुण्यात कॉंग्रेसने नादुरुस्त छत्र्या दुरुस्त करण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.

पुणेकरांची लांबच लांब रांग

तुमच्या छत्र्या मोफत दुरुस्त करून दिल्या जाणार आहेत. आपल्या जवळची नादुरुस्त छत्री मोफत दुरुस्त करून दिली जाईल, असे पोस्टर मोठ्या अक्षरात लिहिले आहे. म्हणून ही संधी कोण सोडणार त्यामुळे पुणेकरांची सकाळपासूनच काँग्रेस भवनाच्या बाहेर छत्र्या दुरुस्त करण्यासाठी छत्र्या घेऊन लांबच लांब रांग लागली. तर पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले आहे काँग्रेसचा हा उपक्रम पुणेकरांच्या पसंतीसही उतरला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींचे वेंटिलेटर फडणवीस आणि चंद्रकात पाटीलांनी चालु करून दाखवावे !

News Desk

#AyodhyaRamMandir | राम सगळ्यांचा असण्यातच राम आहे, रोहित पवारांची भावनिक साद

News Desk

कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

News Desk