HW News Marathi
Covid-19

भारतातील कोरोना लसीचे ट्रायल सीरम इन्स्टिट्यूटने थांबवले 

पुणे | सीरम इन्स्टिट्यूटने देशातील कोरोना लसीवरील ट्रायल्स थांबवल्या आहेत. एका निवेदनाद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने म्हटले आहे, की “आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत, अ‍ॅस्ट्रॅजेनेकाच्या चाचण्या पुन्हा सुरू करेपर्यंत भारताच्या चाचण्या थांबवित आहोत. आम्ही डीसीजीआयच्या सूचनांचे पालन करीत आहोत. त्यामुळे यापुढे यावर भाष्य करणार नाही. या संदर्भात अधिक माहितीसाठी डीसीजीआयशी संपर्क साधावा.

जगभरात कोरोनाव्हायरसचा कहर सुरु असल्याचं बऱ्याच देशांमध्ये यावरील लस लवकरात लवकर निर्माण करण्याचं काम सुरु आहे. परंतु कोरोना व्हायरसमुळे आलेल्या महामारीचा सामना करण्याच्या प्रयत्नांना मोठा झटका बसला आहे. कोरोनाव्हायरसच्या खात्‍म्यासाठी सर्वाधिक अपेक्षा वाढवलेल्या ऑक्‍सफर्डच्या AZD1222 लसीची तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील चाचणी रोखण्यात आली आहे.

ब्रिटनमध्ये एका व्यक्तिला ऑक्‍सफर्डने बनवलेली कोरोनाव्हायरसवरील लस टोचण्यात आली होती. त्याच्या शरारीवर दुष्परिणाम झाल्याचं समोर आलं. यानंतर ही कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी थांबवण्यात आली आहे. मात्र, भारतातील चाचण्या सुरुच राहणार असल्याने सीरम इन्स्टिट्यूटने काल सांगितलं होतं. मात्र, आज पुन्हा या चाचण्या थांबवण्यात आल्याचे सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेने कोकणाला वाऱ्यावर सोडले आहे का? भाजपचा सवाल !

News Desk

येत्या २-३ दिवसात रेल्वे स्थानकावरही तिकीट बुकिंग सुरु होणार | रेल्वेमंत्री

News Desk

लग्न समारंभ व अंत्यसंस्कारमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे । आरोग्य मंत्रालय

News Desk