HW News Marathi
Covid-19

जूनमध्ये लसींचा पुरवठा सुरळीत होणार, ‘सिरम’ १० कोटी डोस पुरवणार, केंद्राला लिहिले पत्र

नवी दिल्ली | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते. रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती. एकीकडे रुग्ण संख्या वाढत होती तर दुसरीकडे कोरोना लसीकरण जोरदार सुरु आहे. अशात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) केंद्र सरकारला एक पत्र लिहिले आहे. ज्यात त्यांनी जुनमध्ये कोरोना लसीचा तुटवडा भासणार नसल्याचं म्हटलं आहे. या पत्रात त्यांनी असं लिहिलं आहे की, जूनमध्ये कोविशिल्ड लसीचे 10 कोटी डोस तयार होऊन ते सर्व डोस पुरवण्यास कंपनी सक्षम असेल, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे देशभरात कोरोना लसीच्या तुटवड्याचा प्रश्न नक्कीच सुटेल असे दिसून येत आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना नुकत्याच पाठवलेल्या पत्रात सीरम इन्स्टिट्यूटने असे सांगितले की, सर्वत्र (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेल्या आजारांमुळे विविध आव्हाने असूनही त्यांचे कर्मचारी २४ तास कार्यरत आहेत. प्रकाश कुमार सिंह म्हणाले, “जून महिन्यात आम्ही आमच्या कोविशिल्ड लसीचे नऊ ते दहा कोटी डोस तयार करत ते पुरवण्यास सक्षम आहोत. मेमध्ये ही उत्पादन क्षमता 6..5 कोटी डोसच्या तुलनेत अधिक असणार आहे,”असं सीरमचे शासकीय व नियामक कार्य संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी पत्रात लिहिले आहे.

जून महिन्यात १२ कोटी लस उपलब्ध होणार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र आहे. मात्र कोरोनाचा फैलाव पुन्हा वेगाने पसरू नये यासाठी उपाययोजना करणं तितकचं गरजेचं आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण हे सर्वात मोठं हत्यार आहे. मात्र गेल्या काही दिवसात लशींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे सरकारकडून लसीकरणाबाबत दररोज माहिती दिली जात आहे. जून महिन्यात १२ कोटी लशींचे डोस उपलब्ध केले जातील, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहीम १ मे पासून सुरु झाली आहे. शुक्रवारपर्यंत देशात २०.८६ कोटी करोना लशींचे डोस दिले गेले आहेत. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात अजूनही १.८२ कोटी लशींचे डोस उपलब्ध असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली होती. तसेच पुढच्या तीन दिवसात ४ लाखांहून अधिक डोस मिळतील असं सांगण्यात आलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील १२ हजार ६६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित

News Desk

सार्वजनिक वाहतूक सुरू होणार – नितीन गडकरी

News Desk

“मोदी स्वत:ला फकीर म्हणवतात, मग दिल्लीत १५ एकरांच्या घराचा उपद्व्याप का ?”

News Desk