HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रात सातव्या वेतन आयोगाला अखेर मुहूर्त लाभला

मुंबई | गेले अनेक महिने राज्यात चर्चत असलेल्या सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या घोषणेला अखेर मुहूर्त लाभला आहे. महाराष्ट्रात सातवा वेतन आयोग गणेशोत्सवाचा मुहूर्त साधत राज्य सरकार सातव्या वेतन आयोगाची थकबाकी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. १ जानेवारी २०१६ पासून वेतन आयोग लागू केला जात आहे.

त्यामुळे थकीत पैकी काही रक्कम गणेशोत्सवात कर्मचार्‍यांना मिळणार आहे. यामध्ये प्रथम श्रेणी कर्मचारी यांना एक लाख रुपये, द्वितीय श्रेणी कर्मचारी यांना ७५ हजार, तृतिय श्रेणी ५० आणि चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांचे २५ हजार बँक खात्यात जमा होणार आहे. दिवाळीपासून प्रत्यक्षात सातवा वेतन आयोग लागू होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

म्हणजेच दिवाळीच्या महिन्यापासून प्रत्यक्ष वाढीव पगार हा कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. सातवा वेतन आयोग लागू करताना आधीच खडखडाट असलेल्या राज्य सरकारच्या तिजोरीवर सुमारे २१ हजार कोटींचा भार पडणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री निधी देताना कोणतीच काटकसर करत नाहीत, अब्दुल सत्तारांचा चव्हाणांना पलटवार

News Desk

शहरातील सर्वस्तरातील नागरिकांनी मेट्रो रेल्वेत प्रवासाची सवय लावून घ्यावी, पंतप्रधानांचे पुणेकरांना आवाहन

Aprna

राज ठाकरे यांचा राज्यपाल कोश्यारींना इशारा, मराठी माणसाला डिवचू नका!

News Desk