HW News Marathi
महाराष्ट्र

२०२० पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम पूर्ण करू !

मुंबई | “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील स्मारकाचे कामा २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येईल,” अशी घोषणा उपमुख्यमत्री अजित पवार यांनी केला आहे. अजित पवारांनी उपमुक्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आज (२ जानेवारी) इंदू मिलमध्ये जावून आंबेडकर स्मारकाच्या कामाची पाहणी केली. त्याआधी पवार यांनी चैत्यभूमीवर जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. “मी कुणाच्याही कामाचे ऑडिट करायला आलो नाही. कामाची पाहणी करायला आलो आहे,” असे अजित पवारांनीमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “इंदू मिलमधील स्मारकाच्या कामात कोणत्याही अडचणी येणार नाही. या स्मारकासाठी काही परवानग्या बाकी आहेत. राज्यस्तरावरच्या या परवानग्या बाकी असून त्या आम्ही लवकरात लवकर देऊ. स्मारकाच्या बाबतीत काही निर्णय मागच्या सरकारमध्ये ठरावीक पातळीवर घेतले होते. कॅबिनेटमध्ये त्याला मान्यता देण्यात आली नव्हती. आम्ही लवकरच या निर्णयाला कॅबिनेटमध्ये मान्यता देऊ. स्मारकाच्या परवानग्यांपासून ते इतर गोष्टी या महिन्यातच पूर्ण करण्यात येणार येईल. स्मारकासाठी जितका निधी लागेल तेवढा देण्यात येणार असून १४ एप्रिल २०२२पर्यंत स्मारकाचं काम पूर्ण करण्यात येईल,” असे ते म्हणाले.

 

Related posts

“महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी ईडीचा वापर होतोय” ,जयंत पाटील

News Desk

१० वी-१२ वीच्या विद्यार्थ्यांना ‘या’ अडचणी असल्यास जूनमध्ये देता येणार परीक्षा

News Desk

सेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना अर्थ नाही – पंकजा मुंडे

News Desk