HW News Marathi
महाराष्ट्र

मंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप, राष्ट्रवादीमध्ये खळबळ

मुंबई | राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी एक घटना घडली आहे. कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा गंभीर आरोप करत एका तरुणीने पोलिसांत धाव घेतली आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज एका महिलेने दिला असल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांनी दिली आहे. मात्र, पोलिसांनी दखल न घेतल्याने तिने याबाबत मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ट्वीट करत तिने ही माहिती दिली आहे.

याबाबत मुंबई पोलीस अधिक तपास करत आहे. १० जानेवारीला याबाबतची तक्रार दिली. ११ जानेवारीला मुंबई पोलिसांकडून अर्ज स्विकारण्यात आला आहे. २००६ पासून अत्याचार सुरु होते. पुढे बॉलीवूडमध्ये चांगली संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. तसेच याचे व्हिडीओ काढून धमकावल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे यावर राष्ट्रवादीकडून आणि खुद्द धनंजय मुंडे यांच्याकडून काय प्रतिक्रिया येणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. तसेच, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावरही बलात्काराचा गुन्हा एका तरुणीने दाखल केला होता. ते प्रकरण ताजे असतानाच आता राष्ट्रवादीच्याच आणखी एका नेत्यावर आरोप झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईच्या समुद्रात दोन जहाजं भरकटली, INS कोच्ची, INS कोलकाता मदतीसाठी रवाना

News Desk

MPSCExam : विद्यार्थ्यांचे मानसिक आणि आर्थिक खच्चीकरण होतंय, फडणवीस सरकारवर भडकले

News Desk

“अधिकाऱ्यांनी मला न विचारताच निर्णय घेतला”, आपल्याच खात्यावर विजय वडेट्टीवारांची नाराजी!

News Desk