HW News Marathi
महाराष्ट्र

आर्यनच्या भेटीसाठी शाहरुख खान पोहोचला ऑर्थर रोड तुरुंगात!

मुंबई।ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक असलेल्या आर्यन खानला बुधवारीही दिलासा मिळू शकला नाही. मुंबईतील एनपीडीएस न्यायालयाने आर्यन खानसह इतर दोन्ही आरोपींच्या जामीन याचिका फेटाळून लावल्या. न्यायालयाने जामीन फेटाळल्यामुळे आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला असून, ऑर्थर रोड तुरुंगात असलेल्या आर्यन खानची भेट घेण्यासाठी आज (२१ ऑक्टोबर) अभिनेता शाहरुख खान सकाळीच तुरुंगात दाखल झाला.

तब्बल आठवडाभर त्याच्या जामीनावर सुनावणी

क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने अटक केलेली आहे. आर्यन खान सध्या कोठडीत असून, त्याला मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आलेलं आहे. तुरुंगात हलवण्यात आल्यानंतर आर्यन खानने एनपीडीएस न्यायालयात जामीनासाठी धाव घेतली होती. तब्बल आठवडाभर त्याच्या जामीनावर सुनावणी चालली. मात्र, बुधवारी न्यायालयाने आर्यन खानला जामीन देण्यास नकार देत याचिका फेटाळून लावली.

न्यायालयाच्या निर्णयानंतर आज (२१ ऑक्टोबर) अचानक अभिनेता शाहरुख खान ऑर्थर रोड तुरुंगात पोहोचला. शाहरुख खान आर्यनची भेट घेणार असून, आर्यनला अटक झाल्यानंतर बापलेकांची ही पहिलीच भेट असणार आहे. शाहरुख खानला आर्यनला भेटण्यासाठी काही मिनिटांचाच वेळ दिला होता.

कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खानला अटक करण्यात आलेली आहे. आर्यन खानला २ ऑक्टोबर रोजी आधी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आणि नंतर अटक करण्यात आली. त्यानंतर आर्यनला कोठडी सुनावण्यात आली होती. आर्यन अजूनही कोठडीत असून, त्याला ऑर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आलेलं आहे. १९ दिवसांपासून आर्यन घरापासून दूर आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“उदय सामंत, शंकरराव गडाख, अब्दुल सत्तार हे १९६६ पासूनचे शिवसैनिक आहेत काय?”

News Desk

निसर्ग जपला तरच शाश्वत विकास शक्य! – मुख्यमंत्री

Aprna

मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा म्हणजे देशाला धोकाचं!- गृहमंत्री दिली वळसे पाटील 

News Desk