मुंबई। कोरोना लढाई करण्यासाठी बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान हा महाराष्ट्रातील डॉक्टर, नर्सेसच्या मदतीचा हात पुढे केला आहे. शाहरुख खानने डॉक्टर, नर्सेसला २५ हजार पीपीई किट्सची मदत केली आहे. शाहरुखने केलेल्या या मदतीसाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी त्याचे आभार मानले आहेत.
कोरोनाशी लढाईमध्ये प्रत्येक जमेल तशी जमेल तितकी मदत करत आहे. यात सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत मदतीचा ओघ सुरू आहे. शाहरुखने याआधी पीएम केअर फंडला आर्थिक मदत केली. त्यानंतर आता त्याने आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी तब्बल २५ हजार पीपीई किट्सचे वाटप केले आहे. (‘पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट’) करोनाग्रस्तांवर उपचार करण्याऱ्या डॉक्टर, नर्सेस यांची सुरक्षा कवच महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी शाहरुखने हे पीपीई किट्स वाटले आहेत. शाहरुखच्या या मदतीसाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत त्याचे आभार मानले आहेत.
Thank you sir for all your help to source the kits. We are all together in this endeavour to protect ourselves and humanity. Glad to be of service. May your family & team be safe and healthy. https://t.co/DPAc7ROh7i
— Shah Rukh Khan (@iamsrk) April 13, 2020
“शाहरुख खान यांनी २५ हजार पीपीई कीट देऊन जी मदत केला आहे. त्यासाठी त्यांचे मनापासून आभार. कोरोनाच्या लढाईमध्ये आम्हाला मदत होईल आणि वैद्यकीय उपचार टीमच्या आरोग्याची काळजीदेखील घेतली जाईल”, असे ट्विट आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. तर शाहरुखनेही त्यांचे आभार मानत सध्याच्या काळात सर्वांना एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. ‘या किट्ससाठी तुम्ही जी मदत केली त्याबद्दल धन्यवाद. मानवजातीच्या सुरक्षेसाठी आपण सर्वजण आता एकत्र येऊन कोरोना विरुद्ध लढुयात. तुमची मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे. तुमची टीम आणि कुटुंबसुद्धा निरोगी व स्वस्थ राहू दे’, असे ट्विट शाहरुखने केले.
याआधीच शाहरुखने वांद्रे येथील त्याची चार मजली कार्यालयीन इमारत विलगीकरणासाठी मुंबई महापालिकेला दिली आहे. शाहरुख आणि गौरीने मदतीचा हात केल्याने महापालिकेने त्यांचे विशेष आभार मानले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.