HW News Marathi
महाराष्ट्र

शहीद जवान नरसिंग जिल्लेवाडवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार

उत्तम बाबळे (नांदेड) :- भोकरचे भूमीपूत्र शहीद जवान नरसिंग जिल्लेवाड याच्यावर हजारोंच्या साक्षीने शोकाकूल वातावरणात शनिवारी भोकर येथील वैकुंठधाममध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

भारतीय इंडो तिबेटियन सिमा सुरक्षा दलातील जवान नरसिंग शिवाजी जिल्लेवाड यांना 22 रोजी भारत चीन सिमेवर कर्तव्य बजावताना वीर मरण आले. तेथील भौगोलीक परिस्थितीशी सामना करत २५ ऑगस्ट रोजी गुहाटी येथे त्यांचे पर्थिव आणण्यात आले. २६ रोजी सकाळी ९:०० वाजता भारतीय तिबेट सिमा सुरक्षा दलाचे कॅप्टन जोयंता सैकिया व बीजू वर्जिस यांनी आपल्या ११ जणांच्या चमूसह ते पार्थीव अँब्लूलन्स व्हॅनने भोकर येथे त्यांच्या घरी आणले. यावेळी शहीद नरसिंग जिल्लेवाड यांच्या पार्थीवाचे अंत्यदर्शन हजारो नागरिकांनी घेतले.

दुपारी बारा वाजता जिल्लेवाड यांची अंत्ययात्रा त्यांच्या घरुन व्यंकटेश टाॅकीज येथून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चाैक ते गांधी चाैक मार्गे वैकुंठधाम हिंदू दहनभूमी येथे निघाली. यावेळी भोकर शहरातील व्यापा-यांनी दुकाने बंद ठेवली होती व हजारो नागरीक अंत्ययात्रेत सहभागी होऊन ” भारत माता की जय!,अमर रहे अमर रहे, शहीद नरसिंग जिल्लेवाड अमर रहे !”च्या जयघोषानांनी शहर दणानून सोडले होते. दहनभूमीत शहीद नरसिंग जिल्लेवाड यांना प्रथम भारतीय इंडो तिबेटियन सिमा सुरक्षा दलाच्या जवानांनी व नंतर नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीसांनी बंदुकीच्या तीन फे-या हवेत झाडून सलामी दिली.तसेच पोलीस दलातर्फे अति.पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय वाळके, पो.नि.रामा पडवळ यांनी व महसूल विभागातर्फे उपविभागीय अधिकारी दीपाली मोतीयेळे,तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहीली. यानंतर शहीद नरसिंग जिल्लेवाड यांच्या चितेला त्यांचा मुलगा ओंकार याच्या हस्ते भडाग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव पा.नागेलीकर, सभापती जगदिश पाटील, नगराध्यक्ष साहेबराव सोमेवाड, उपनगराध्यक्ष गोविंद पाटील,जि. प. सदस्य बाळासाहेब रावणगावकर, दिवाकर रेड्डी, रा. काँ. पार्टीचे ता. अ. सुभाष पा. घंटलवार, जवाजोद्दीन बरबडेकर, नगरसेवक शे. वकील शे. खैराती, नगरसेवक खाजा तौफिक इनामदार, राजेश्वर कदम,शिवसेना ता. प्र. सतीश देशमुख, माजी सभापती नागनाथ घिसेवाड, प्रा.डॉ..व्यंकट माने, संपादक उत्तम बाबळे, युसूफ भाई, अ.सलीम सर,प्रकाश कोंडलवार, बाळा साकळकर, एल. ए. हिरे, मनोहर बट्टेवाड, श्रीनिवास बोलेवार, बाळू डुबूकवाड, मोहन श्रीकंठवाड, ओम पिंगलवाड, दिलीप वाघमारे, कोटूरवार यांसह विविध पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते,अधिकारी,कर्मचारी, व्यापारी, पत्रकार, नातेवाईक, मित्रपरिवार,आदींची बहुसंख्येने उपस्थिती होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सीबीआयला १३,०४३.५७ कोटीचा बुडीत घोटाळयांची चौकशीला सरकार परवानगी का देत नाही ?, आशिष शेलारांचा सवाल

Aprna

बीडमध्ये महावीतरणाच्या विरोधात परळीत भाजप युवा मोर्चाचे अनोखे आंदोलन

Aprna

शिवसेनेने विश्वासार्हतेचे फाटलेले ठिगळ सावरण्यासाठी शाहू महाराजांची घेतली भेट! – प्रविण दरेकर

Aprna