HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांच्या आजारावर टीका करणाऱ्या भाजप नेत्याला शिवसेनेने फटकारलं!

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात कथित भेटींच्या चर्चांना दिल्लीसह महाराष्ट्रात उधाण आलं होतं. त्यानंतर दिल्लीत शरद पवारांच्या हालचलीवर लक्ष ठेवण्यात येत होतं. शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास वाढल्यानं मंगळवारी रात्री त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. शरद पवारांना मंगळवारी मुंबईच्या ब्रीच कँडी रूग्णालयात भरती करण्यात आल्यानंतर दिल्लीतल्या काही भाजप नेत्यांनी, हे शरद पवारांचं राजकारण आहे, अशी टीका केली होती. त्यावर आता गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी या भाजप नेत्यांना चांगलंच फटकारलं आहे.

भाजप नेते नविन कुमार जिंदल यांनी एक ट्विट केलं होतं. सचिन वाझे यांनी तपास यंत्रणेला काय सांगितलं की, शरद पवार यांच्या पोटात इतक्या जोरात दुखायला लागलं. त्यांना रूग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. मला तर वाटतं, ‘दाल मे कुछ काला नही है, पुरी दाल ही काली है’, असं नविन कुमार जिंदल म्हणाले होते.

शरद पवारांच्या आजारपणावरून ट्विट केल्यानं शंभुराज देसाई यांनी जिंदल यांना फटकारलं. शरद पवारांच्या आजारपणात भाजप नेत्यांनी राजकारण करावं हे काही बरोबर नाही. मला अशा लोकांची कीव करावी वाटते, असं उत्तर शंभुराज देसाई यांनी दिलं. भाजपच्या जिंदल यांनी शरद पवारांच्या आजाराचा संबंध सचिन वाझे प्रकरणाशी जोडल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जिंदल यांना टॅग करत त्यांच्यावर जोरदार टीका केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘वानखेडे जन्मापासून मुस्लिमच, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या उपाध्यक्षांनी दिलेली क्लीनचीट संशयास्पद

News Desk

“नुसतं मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय करताय?”, नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

News Desk

#MaharashtraElections2019 LIVE UPDATE | राज्यभरात ५५. ३५ टक्के मतदान, आता निकालाची प्रतिक्षा

News Desk