HW News Marathi
महाराष्ट्र

‘त्या’ ट्वीटनंतर शरद पवारांनी सचिनला दिला ‘हा’ सल्ला, म्हणाले….!

पुणे । आंतरराष्ट्रीय पॉप गायिका रिहानाने सर्व प्रथम देशातील शेतकरी आंदोलनाला समर्थन देणारे टि्वट केले आणि देशातील वातावरण ढवळून निघाले. रिहाना, ग्रेटा थनबर्ग आणि मिया खलिफा या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे टि्वट केल्यानंतर देशातील अनेक सेलिब्रिटींनी त्या विरोधात भूमिका घेत देशातील एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करत मोदी सरकारच्या बाजूने ट्विट केले. यात भारताचा सर्वोत्तम क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा देखील समावेश होता. मात्र, सचिनच्या त्या ट्विटनंतर तो देशवासियांच्याच निशाण्यावर आला. दरम्यान, त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सचिनला एक सल्ला दिला आहे.

“लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्या प्रतिक्रियांवर अनेक सामान्य लोक तीव्रपणे व्यक्त होत आहेत. आपले क्षेत्र सोडून बाकी विषयांवर बोलताना काळजी घ्यावी असा माझा सचिनला सल्ला राहील”, असे शरद पवार यावेळी म्हणाले. आज (६ फेब्रुवारी) पुण्यात कार्यक्रमासाठी आलेल्या शरद पवार यांना पत्रकारांनी याविषयी प्रश्न विचारले. त्यावेळी शरद पवारांनी सचिन तेंडुलकरला हा सल्ला दिला आहे. दरम्यान, शेतकरी आंदोलनावरून देशातील वातावरण ढवळून निघालेले असताना यावरून २ गट पडल्याचे पाहायला मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पडळकरांच्या जीवाला धोका, संरक्षण देणं सरकारची जबाबदारीच! – सदाभाऊ खोत

News Desk

“सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी पुतळा स्थापित करण्याचा शासनाचा प्रयत्न!” – भुजबळ

News Desk

फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि आमचे हे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरु, आठवलेंचा गौप्यस्फोट

News Desk