मुंबई | संपूर्ण देशभरातून ज्या कृषी विधेयकाला विरोध केला होता त्या विधेयकाचे रुपांतर कायद्यात झाले आहे. दरम्यान, त्या विधेयकाला विरोधी करत एनडीएतून बाहेर पडलेल्या शिरोमणी अकाली दलाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अभिनंदन केले आहे. शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल पवारांनी बादल कुटुंबाचे आभार मानले आहे.
‘कृषी विधेयकाच्या निषेधार्थ प्रकाशसिंग बादल यांच्या नेतृत्वात एनडीएतून बाहेर पडलेले अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल आणि खासदार हरसिमरत बादल यांचे अभिनंदन, शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल धन्यवाद!’ असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेत मंजूर करण्यात आलेल्या कृषीविषयक तीन विधेयकांना मंजुरी दिली आहे. याबाबचे राजपत्र आज प्रकाशित झाले आहे. राष्ट्रपतींनी विधेयकांना मंजुरी दिल्याने त्यांचे कायद्यात रुपांतर झाले आहे. संसदेने मंजूर केलेल्या विधेयकांना राष्ट्रपतींनी २४ सप्टेंबरला मंजुरी दिल्याचे राजपत्रात म्हटले आहे.
Congratulations to Shri Sukhbir Singh Badal President of @Akali_Dal_ and MP @HarsimratBadal_ who under the leadership of Hon. Shri Prakash Singh Badal pulled out of NDA in a protest to Farmers’ Bills. Thanks for firmly standing with the Farmers! @officeofssbadal
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 27, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.