HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीस येत आहेत चांगली आहे, त्यांच्या ज्ञानात भर पडेल !

मुंबई। निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, यांची पाहाणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे देखील कोकण दौरा करणार आहे. यावर शरद पवार म्हणाले, “फडणवीस येत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. त्यांच्या ज्ञानात भर पडेल, ” असा टोला त्यांनी लगावली आहे.

निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणाचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहे, असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवार यांनी विचारला, त्यावर पवार म्हणाले, “कोकणात किती नुकसान झाले आहे. हे सर्वांना कळले पाहिजे. प्रत्येक जण वेगळ्या भागांतून येतो. मी बारामतीच्या दुष्काळी भागातला आहे. ते नागपुरातले आहेत. समुद्राचा आणि नागपूरचा काही संबंध नाही. त्यामुळे सगळ्यांच्या ज्ञानात भर पडेल. आमच्याही पडते आहे. फडणवीस यांच्या ज्ञानात भर पडेल ही चांगली गोष्ट आहे.”

असा आहे फडणवीसांचा कोकण दौरा

देवेंद्र फडणवीस उद्या ११ आणि परवा १२ जून असे दोन दिवस कोकणाचा दौरा करणार आहेत. या दोन दिवसांत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत विविध ठिकाणी ते भेटी देऊन चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी करणार आहेत. ११ जून रोजी रायगड जिल्ह्यातील रेवदंडा, चोल, काशिद, राजपुरी, आगरदंडा, दिघी, दिवेआगर, श्रीवर्धन इत्यादी ठिकाणी ते भेटी देणार आहेत. त्यातनंतर १२ जून रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास, केळशी, अंजर्ले, पाजपांढरी आणि दापोली येथे भेटी देऊन नुकसानीची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही सरकार पाडणार नाही, पण पडेल त्या दिवशी अल्टरनेट देऊ, फडणवीसांचं महत्वाचं विधान

News Desk

अखेर ब्रिटिशकालीन १८९ वर्षे जुना अमृतांजन पूल जमीनदाेस्त

News Desk

“राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरपला”, अजित पवारांनी वाहिली श्रद्धांजली

Aprna