HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

फडणवीस ‘मी पुन्हा येईन’ म्हणाले आणि जनतेने त्यांना धडा शिकवला ,पवारांचा टोला !

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सामना या वृत्तपत्रात मॅरेथॉन मुलाखत घेतली. शरद पवार यांची ही ऐतिहासिक मुलाखत आणि त्याचे प्रोमो संजय राऊत त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून पोस्ट करत होतेच. आणि आज त्या मुलाखतीचा पहिला भाग प्रदर्शित झाला. यात त्यांनी अनेक मुद्द्यावर चर्चा केली.

वर्षभरापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्यावर देशाची परिस्थीती आणि राजकारण जैसे थे राहिले. केंद्रात भाजपचे सरकार तसेच राहिले यावर शरद पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी अगदी मार्मिकपणे सर्व उत्तरे दिली. देशातल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातल्या जनतेने देखील देशात जे चित्रं होत त्याच्याशी सुसंगत अशी भूमिका घेतली. राज्याचा प्रश्न आला तेव्हा महाराष्ट्रात चित्र वेगळं पाहायला मिळालं. शिवसेनेची काम करण्याची विशिष्ठ पद्धत आहे. एखादी गोष्ट हाती घेतल्यानंतर ठोसपणे ती राबवायची मग त्यासाठी कितीही कष्ट आणि किंमत मोजावी लागली तरीही ते काम पूर्ण करायचं. भाजपसोबतच्या कालखंडात शिवसेनेला गप्प कसं ठेवता येईल आणि बाजूला कसं ठेवता येईल ही भूमिका भाजपने सातत्याने केली.

५ वर्ष महाराष्ट्राच्या जनतेने पहिली ती खऱ्या अर्थाने भाजपचे सरकार असावे अशी होती. याआधी देखील युतीचे सरकार होते. मात्र तेव्हा असे वातावरण नव्हते. कारण त्याचं नेतृत्व शिवसेनेकडे आणि बाळासाहेबांकडे होते. मात्र आता जे दोघांचे सरकार होते त्यात भाजपने शिवसेनेला जवळपास बाजूला केले आणि पुढच्या कालखंडात राज्य भाजपच्या विचाराने आणि नेतृत्वाने चालणार ही भूमिका भक्कमपणे घेऊन त्यांनी पावले टाकली आणि महाराष्ट्राच्या जनतेला ते पटले नव्हते. भाजपची आम्हीच राजकारण इथे करू शकतो अशी भावना दिसत होती.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन असे म्हटले होते. यावर शरद पवारांनी उत्तर देताना म्हटले की, कुठल्याही राजकीय नेत्याने मीच येणार ही भूमिका घेऊन जनतेला गृहीत धरायच नसतं. अशा गृहीत धरण्यात थोडासा दर्प असल्याची भावना लोकांच्या मनात निर्माण झाली आणि त्यांनी धडा शिकवला पाहिजे हा विचार लोकांच्यात पसरला.

Related posts

मला वाटले हे राज्यभर बंद पाळतील, पण यांनी फक्त बारामतीत बंद पळाला !

News Desk

वीरपत्नी लेफ्टनंट स्वाती महाडिक यांची यशोगाथा

News Desk

#LokSabhaElections2019 : आज होणार महाआघाडीची अधिकृत घोषणा

News Desk