HW News Marathi
Covid-19

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यात पुर्ण लक्ष आहे,पवारांकडून कौतुक

नाशिक | कोरोनाच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न सुरू आहेत. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच सोलापूर दौरा केला होता. आज (२४ जुलै) त्यांनी नाशिक दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. आढावा घेतल्यानंतर पवार यांनी पत्रकार परिषदेतून माध्यमांशी संवाद साधला.

“भारतात सध्या महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली आणि कर्नाटक या राज्यांत रुग्णसंख्या वाढली आहे. महाराष्ट्राचा विचार केल्यास मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, सोलापूर, अकोला या ठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अनेक तज्ज्ञांनी आपल्याला येत्या काळात कोरोनासोबत जगावे लागेल, असे मत व्यक्त केले आहे. राज्यातील ज्या जिल्ह्यांत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्या जिल्ह्यांतील सर्व प्रमुखांची बैठक घेऊन, समस्या जाणून त्यावर मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे”, असे शरद पवार यांनी म्हटले

“राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील काही महिने कोरोनाशी लढण्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊन त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना द्यावा हा आमचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने आज नाशिक जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली आहे. राज्यात आपण टेस्टिंग वाढवल्याने रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. रुग्णांसाठी बेड्सची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने आरोग्य खात्याकडून पुढील काही दिवसात महत्त्वपूर्ण पावले टाकण्यात येतील. त्यासाठी एक यंत्रणा तयार करण्यात आली आहे”, असेही त्यांनी सांगितले.

“राज्याचे आरोग्य विद्यापीठ नाशिकमध्ये आहे. पण तेथील डॉक्टर रुग्णसेवा देण्यासाठी पुढे येत नाहीत, असे करून चालणार नाही. जिल्ह्याच्या यंत्रणेला डिझास्टर मॅनेजमेंट कायद्यानुसार डॉक्टरांवर अधिकारांचा वापर करावा लागू नये ही आमची भूमिका आहे. पण वेळ आल्यास तशी सक्ती करण्याची गरज भासू शकते”.

“नाशिक जिल्ह्यातील गरजू कोरोना रुग्णांसाठी मी रेमडेसिव्हिर या महागड्या औषधांची उपलब्धता करून ५० औषधे जिल्हाधिकाऱ्यांच्या सुपूर्द केली आहेत. याआधी देखील २५ औषधे देण्यात आली होती तसेच गरजू रुग्णांच्या उपचारांसाठी मी नेहमीच पुढाकार घेईन”. असे आश्वासन देखील त्यांनी दिले.

“आरोग्याप्रमाणे आर्थिक संकटदेखील मोठे आहे. राज्यात नामांकित औद्योगिक केंद्रे आहेत. ही केंद्रं सुरू करून महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती कशी सुधारता येईल याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा, असे जिल्हा प्रशासनाला आवाहन आहे. मात्र कोरोना रुग्णसंख्या वाढेल अशी भूमिका कोणी घेऊ नये. आतापर्यंत विशेषतः महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाजाने बासी ईद, रमजान ईदच्या वेळेस अतिशय समंजसपणाची भूमिका घेतली. सहकार्य यापुढेही असेल” असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या पत्नी कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

धारावीतील ऑक्सिजन सुविधायुक्त २०० खाटांचे विशेष रुग्णालय आजपासून होणार कार्यान्वित

News Desk

परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट लस, मुंबई महापालिकेची नियमावली जाहीर

News Desk