मुंबई | महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या अनेक विषयांवरुन कुरघोड्या सुरु असल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नाही तक ठाकरे सरकारमध्ये काहीच ठीक नसल्याचं म्हटलं जात असलंही तरी सरकारमधील नेते मात्र सगळं काही आलबेल अशल्याचं सांगत आहेत. अशात नेत्यांच्या, मंत्र्यांच्या गाठीभेठी मोठ्या प्रमाणावर सुरु झाल्या आहेत. नुकतीच, शिवसेनेचे खासादर संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज (२९ जून) पुन्हा संजय राऊतांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर आता स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या ईडी आणि सीबीआयच्या कचाट्यात सापडले आहेत. त्यामुळे याच विषयावर बातचीत करण्यासाठी तर ही भेट नाही ना असेही तर्क वितर्क लावले जात आहेत.
शरद पवार उद्दव ठाकरेंच्या भेटीला
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल आहेत. या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले असून नव्या कोणत्या राजकीय घडामोडी घडतात याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा ईडीने समन्स बजावला. या चौकशीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याची सूत्रांकडून माहिती समजते आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादीचे दिग्गज मंत्री वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत की काय अशी चर्चा सुरू आहे. अनिल देशमुख यांना ईडीने समन्स बजावलं आहे. मात्र अनिल देशमुख यांनी प्रत्यक्ष चौकशीला येण्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशी घेण्याची विनंती केली आहे. याशिवाय त्यांनी सात दिवसांची मुदत मागितली आहे, त्याला ईडीने परवानगी दिली आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असतील पण नाराजी नाही
दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे हे सुद्धा वर्षा बंगल्यावर उपस्थित आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी शरद पवार यांची सिल्व्हर ओक बंगल्यावर जाऊन भेट घेतली. त्यानंतर आज राष्ट्रवादीचे दोन्ही नेते वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहे. महाविकास आघाडीत एखाद्या विषयावर मतभेद असू शकतात; पण नाराजी अजिबात नाही, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज स्पष्ट केले. विरोधकांनी महाविकास आघाडीची चिंता करु नये, असा टोलाही त्यांनी लगावला.
राऊतांच्या गाठीभेठी
सोमवारी राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. याबाबत बोलताना ते म्हणाले, प्रत्येक भेटीमागे राजकारण दडलय असा अर्थ काढण चुकीचे आहे. विरोधकांनी महाविकास आघाडीची चिंता करु नये. तिन्ही पक्षाच सरकार व्यवस्थित सुरु आहे. दोन वर्षात तिन्ही पक्षांनी उत्तम कामं केली आहेत. आमदार प्रताप सरनाईक आणि अनिल देशमुख यांची बाजू समजून घेण गरजेच आहे,असेही राऊत यांनी सांगितले. सध्या महाविकास आघाडी सरकार मध्ये सर्व काही अलबेल नसल्याच्या चर्चा सुरु आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी म्हाडाची घरे टाटा हॉस्पिटलला देण्याचा निर्णय स्थगित केला होता. यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर शरद पवार नाराज असल्याची चर्चा होती. यावर खुलासा करताना राऊत म्हणाले, आघाडी सरकारमधील मित्रपक्षात नाराजी नाही. मतभेद असू शकतात.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.