HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई | मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर महाविकासआघाडी सरकारच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी गाडी उभी होती त्या प्रकरणात पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव समोर आले आणि नवे नवे खुलासे समोर येऊ लागले. अखेर सचिन वाझे यांना अटक तर करण्यात आली पण आता त्यांचे निलंबनही करण्यात आले आहे. या सगळ्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी आज (१५ मार्च) वर्षा निवासस्थानी भेट घेतली आहे. त्यांच्या चर्चेचा केंद्रबिंदु सचिन वाझे प्रकरण असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, महाआघाडी सरकारमधील वादग्रस्त प्रकरण आणि सरकारची मलिन होत असलेली प्रतिमा या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख मंत्र्यांची आणि नेत्यांची बैठक बोलावली आहे. दोन सत्रात ही बैठक होणार आहे.पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणापासून ते मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे अटकेपर्यंत या ना त्या मुद्यांमुळे महाविकास आघाडी सरकारला बॅकफूटवर जावे लागले आहे.

यामुळेच महाविकास आघाडीचे शिल्पकार असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची मुंबई महत्त्वाची बैठक बोलावली आहे. सचिन वझे, संजय राठोड, धनंजय मुंडे, अर्थसंकल्पीय अधिवेशनात सेना राष्ट्रवादीमध्ये झालेली रस्सीखेच या सर्व गोष्टींचा आढावा शरद पवार आजच्या बैठकीत घेणार आहेत. सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रात ही बैठक होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरे सरड्या सारखे रंग बदलतात! – अजित पवार

Aprna

राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांना धमकीचा फोन, ऑफिस जाळून देण्याची दिली धमकी

News Desk

महाराष्ट्राने आता राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवायला पाहिजे – संजय राऊत

News Desk