HW News Marathi
महाराष्ट्र

“संभाजीनगर म्हणा, धाराशिव म्हणा,या प्रकरणाकडे मी गांभीर्यानं बघत नाही” – शरद पवार

मुंबई | राज्यात अनेक विषयांवरुन गोंधळ तर सुरु आहेच. मग मंत्री धनंजय मुंडेंचा विषय असो किंवा औरंगाबादच्या नामांतराचा. यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष औरंगाबादच्या नामांतरावरुन महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्ये एकमत नसून परस्परविरोधी वक्तव्यं केली जात आहेत. काँग्रेस नामांतराला विरोध करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र आपण वर्षानुवर्ष ही मागणी करत असल्याचं सांगत भूमिकेवर ठाम असल्याचं दाखवलं आहे. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आमची भूमिका मुख्यमंत्र्यांना निश्चित पटवून देऊ असं म्हटलं होतं.

मुख्यमंत्री कार्यालायच्या ट्विटर हँडलवर औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ असा उल्लेख करण्यात आल्यानंतर हा वाद नव्याने निर्माण झाला होता. त्यातच आता उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव असा करण्यात आला आहे. यावरु शरद पवार यांनी भाष्य केले आहे. शरद पवार यांनी सांगितलं की, “आमच्यात वाद नाहीत. संभाजीनगर म्हणा, धाराशिव म्हणा, नाहीतर अजून काही म्हणा..या प्रकरणाकडे मी गांभीर्यानं बघत नाही. त्यामुळे मी कधीही भाष्य केलं नाही”.

उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं?सीएमओ ट्विटर हॅण्डलला संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला असं विचारण्यात आलं असता उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते की, “त्याच्यात नवीन काय केलं मी…जे वर्षानुवर्ष बोलत आलो आहे तेच केलं आहे आणि तेच स्वीकारणार”. यावेळी त्यांना काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या नाराजीबद्दलही विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले की, “औरंगजेब काही धर्मनिरपेक्ष नव्हता. त्यामुळे आमच्या अजेंड्यात धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे त्याच्यात औरंगजेब बसत नाही”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या ट्विटवर माणिकराव ठाकरेंनी दिली ही प्रतिक्रिया 

News Desk

छत्रपती घराण्यांचा अपमान केल्याबद्दल वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करा

News Desk

मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपालांनी केली स्वाक्षरी

News Desk