HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षणावर शरद पवारांनी ही दिली प्रतिक्रिया….

नवी दिल्ली | मराठा आरक्षणावरुन सध्या मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्य सरकारवर टीका विरोधकांकडूनही सुरु आहे. केंद्र-राज्य असा वाद नको, कोर्टात जे वकील दिले ते लहान नव्हते, अध्यादेश काढला तर मराठा आंदोलन होणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. ते दिल्लीत बोलत होते. आज (११ सप्टेंबर) संसदेच्या अधिवेशनासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह ते दिल्लीला गेले आहेत.

“मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने अध्यादेश काढायचा निर्णय घेतला, तर मार्ग निघेल. मला त्याबाबत कायदेशीर बाजू माहिती नाही, जर त्याबाबतचा पर्याय निघाला, तर मला वाटतं कोणीही रस्त्यावर उतरणार नाही, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणप्रकरणात जे वकील दिले ते ख्यातनाम होते. कपिल सिब्बल किंवा महाधिवक्ते हे ज्युनिअर आहेत का? आम्हाला समाजाला न्याय द्यायचा आहे. मला कोर्टाकडून पुन्हा न्याय मिळेल असं वातावरण हवं”, असं शरद पवार म्हणाले.

“इतर राज्यात आरक्षण दिले, तर मग महाराष्ट्राने अपेक्षा केली त्यात मला काही गैर वाटत नाही.विरोधक यात सरकारची कमतरता सांगतात, पण विरोधकांना राजकारण करायचं आहे. विरोधकांनी आंदोलन करुन काही होणार नाही. हा प्रश्न कोर्टातूनच सुटणार आहे. कोर्टाच्या निर्णयावर मी काही बोलू शकत नाही. पण आम्ही पुन्हा एकदा कोर्टात जाणार”, असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सुशांतसिंग आत्महत्याप्रकरणी सीबीआय तपास करत आहे, ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी लक्ष घालावे, असे शरद पवारांनी नमूद केले आहे. तर ड्रग्सच्या विषयात गांभीर्याने लक्ष द्यायची गरज आहे”, असे मत त्यांनी यावेळी मांडले.

तसेच, कंगनावर जी कारवाई केली ती मुंबई महापालिकेने केली. माझ्या माहितीनुसार महापालिकेच्या कायद्यानुसार ही कारवाई झाली. यामध्ये राज्य सरकारचा काही संबंध नाही,असेही त्यांनी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नीरा-देवघर प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता; माढा लोकसभा मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अनेक निर्णय

Aprna

पुण्याची अवस्था मुंबईसारखी होऊ नये !, महापौरांनी व्यक्त केली भीती

News Desk

चंद्रपूर जिल्ह्यात पुरात अडकलेल्या नागरिकांचे स्थलांतर  

Aprna