HW News Marathi
Covid-19

पुण्याच्या उपचार पद्धतीवर शरद पवारांनी उपस्थित केला प्रश्न

पिंपरी- चिंचवड | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (३ सप्टेंबर) अचानक चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात कसे योग्य उपचार दिले जातात. याबाबत राष्ट्रवादी,भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि पालिका आयुक्त मिरवत होते. त्यांचे पवारांनी सर्वांचे कान टोचले आहेत. पुण्यात वेळेत सुविधा उपलब्ध न झाल्याने पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला आहे. या गोष्टींकडे पवारांनी बोट दाखवले आहे आणि पिंपरीतल्या जंबो कोविड सेंटरमध्ये नक्की कसे उपचार दिले जात आहेत? हा महत्वाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पत्रकार असो की सामान्य यात अनेक जणांचे मृत्यू होत आहेत.

डॉक्टर्स नाही, नर्स नाही, वेळेवर औषध नाही अशा तक्रारी येत असल्याची खंत ही पवारांनी व्यक्त केली. पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूनंतर पुण्यातील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले. पुण्यातील जंबो कोविड सेंटरचा निष्क्रिय कारभार ही यानिमित्ताने चव्हाट्यावर आला. शहरातील कोरोना रुग्णांनी ५० हजारांचा टप्पा आणि मृतांचा आकडा नऊशेच्या घरात जायची वेळ आली असताना ही तात्पुरती रुग्णालये रिकामी का? असा प्रश्न उपस्थित झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही वर्क फ्रॉम होम

News Desk

महाराष्ट्रावर पुन्हा कोरोनाचे सावट, मुंबईत पुन्हा लॉकडाऊन होणार?

News Desk

रक्षा खडसे यांना कोरोनाची लागण

News Desk