HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

सुशांतच्या आत्महत्येवर मीडियात होणारी चर्चा आश्चर्यकारक, शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्याकडे मिडियाचे लक्षच नाही

मुंबई | सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येनंतर अनेक प्रतिक्रिया आल्या. मात्र, आत्तापर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आज (१२ ऑगस्ट) माध्यमांशी बोलताना त्यांनी आपले मत मांडले आहे. आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शिवसेना खासदार संजय राऊत आणि शरद पवार यांची बैठक झाली. त्यानंतर ते बोलत होते.

“एका अभिनेत्याने आत्महत्या केली हे दुर्दैव आहे, हे व्हायला नको होते. पण, ज्या पद्धतीने मीडियात चर्चा होत आहे त्याचे आश्चर्य वाटत आहे. माझ्या जिल्ह्यातील २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पण मीडियाने त्याची नोंद घेतली नाही”, अशी खंत पवारांनी व्यक्त केली.

“महाराष्ट्र तसेच मुंबई पोलिस सक्षम आहे. त्यांच्यासह मला १०० टक्के विश्वास आहे. पण तरीही सीबीआय किंवा इतर यंत्रणेने तपास करावा असे वाटत असेल तर मी त्याला विरोध करणार नाही. चौकशी कोणी करायची हा राज्य सरकार, सीबीआयचा प्रश्न आहे”.

Related posts

Breaking News| अंधेरीच्या मधु इंडस्ट्रियल इस्टेटच्या एका इमारतीला आग

News Desk

राष्ट्रवादीत शिरूर मतदारसंघावरून पेटला वाद, विलास लांडेंचे समर्थक आक्रमक

News Desk

सालाबादप्रमाणे CBSE१० वीच्या निकालात मुलींनी मारली बाजी !

News Desk