HW News Marathi
महाराष्ट्र

यूपीएच्या अध्यक्षपदाच्या संदर्भामध्ये कोणतंही तथ्य नाही, शरद पवारांचे स्पष्टीकरण 

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पाठीमागे काँग्रेस खंबीरपणे उभी आहे. येत्या काही काळात शरद पवार युपीएचे अध्यक्ष होणार अशी चर्चा कालपासून राजकीय वर्तृळात सुरु होती. त्या चर्चेला आता खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुर्णविरोम लगावला आहे. महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी एकत्र आलेल्या शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी या भिन्न विचारसरणीच्या पक्षांची वर्षभरात चांगलीच गट्टी जमली.

राष्ट्रीय स्तरावरही विरोधी अश्याच प्रकारे पक्षांशी मोट बांधली जावी, याकरिता सोनिया गांधी शरद पवारांकडे यूपीएचे अध्यक्षपद सोपवू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. महाराष्ट्रातला कित्ता दिल्लीतही गिरवला जावा आणि केंद्रामधलं सरकार सत्तेच्या खाली खेचावं, हे सगळं प्लॅनिंग पवारांकडे देण्याचं नियोजन सोनिया यांचं असल्याचं बोललं गेलं. मात्र “या सगळ्या चर्चा आहेत. यूपीएच्या अध्यक्षपदाच्या संदर्भामध्ये कोणतंही तथ्य नाही”, असं दस्तुरखुद्द शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं विरोधक एकत्र येताना दिसत आहेत. याच विरोधी पक्षांचं नेतृत्व शरद पवार करणार असल्याच्या बातम्या दिवसभर माध्यमांधून देण्यात आल्या. मात्र UPA चं प्रमुखपद मी स्वीकारणार असल्याच्या चर्चा तथ्यहीन आहेत, असं पवार म्हणाले आहेत. त्यामुळे आता स्वत: पवारांनी असे म्हटल्याने ही चर्चा सध्या तरी इथेच थांबली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नांदेडला समृद्धी महामार्गाशी जोडणार!, राज्य शासनाचा निर्णय

News Desk

जाणून घ्या…निरा डाव्या कालव्याचा संघर्ष

News Desk

पवारांना प्रत्येक नागपूर कर गुंड वाटू लागले !

News Desk