HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांना मी ५० वर्ष ओळखतो, माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे – शरद पवार

मुंबई | “माझा महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. मात्र सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशी करायची असेल, तर मी विरोध करणार नाही”, अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची आज (१२ ऑगस्ट) यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट झाली. त्यावेळी पहिल्यांदा सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“मी महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस यांना ५० वर्ष ओळखतो. माझा पूर्ण विश्वास आहे. कुणी काय आरोप केले, याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. माझ्यासाठी हा विषय तितका महत्त्वाचा नाही. एखाद्याने आत्महत्या केली, तर निश्चितच दु:ख होतं, पण याची चर्चा ज्या पद्धतीने होते, मला त्याबद्दल आश्चर्य वाटतं” अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

Related posts

निवडणुकीच्या तयारीला लागा-शरद पवार यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

News Desk

ड्रोणद्वारे दुष्काळाची पाहणी

News Desk

ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर होणार का ?

Gauri Tilekar