HW News Marathi
महाराष्ट्र

३० वर्षांपासून शिवसेनेचा एकहाती भगवा फडकवण्याचा नारा ऐकत आहे – शरद पवार

नाशिक | महाराष्ट्रात एकहाती शिवसेनेचा भगवा फडकवण्यास सज्ज राहा, आत्तापासूनच तयारीला लागा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना काल दिले आहेत. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी हे विधान केलं आहे. मुंख्यमंत्र्यांचा या विधानानंतर अनेक तर्क वितर्कांना सुरुवात झाली आहे. कारण सध्या राज्यात ३ पक्षांचे एक सरकार आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख काही वेगळे पाऊल उचलणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरेंच्या या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले की, गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे भाषण ऐकत आलो आहे. प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या विधानावरुन वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. शरद पवार कांदाप्रश्नी नाशिक दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात भाजप आणि महाविकास आघाडीत अनेक विषयांवरुन वाद विविध सुरुच आहेत. भाजप वारंवार आघाडी सरकार पाडण्याच्या गोष्टी करत आहे. तर कधी स्वत:हून हे सरकार पडेल असे म्हणत आहे. यावरुन आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाचे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिल्याची माहिती आहे. शिवसेना जिल्हाप्रमुखांसोबत काल रात्री उशिरा पार पडलेली व्हिडीओ कॉन्फरन्स बैठक तब्बल बराच काळ सुरु होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही पोपट-बीपट पाळत नाही…ते काम शिवसेनेचंच !, चंद्रकांत पाटलांची टीका

News Desk

Bhima Koregaon Case : नवलखांना अटक करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी

News Desk

“अजित पवार अजून अज्ञानी”, नारायण राणेंचा अजित पवारांवर निशाणा

News Desk