HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांची गणपतराव देशमुखांच्या कुटुंबीयांना सांत्वन भेट!

पंढरपूर। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज(8ऑगस्ट) सांगली दौऱ्यावर आहेत. दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट ते घेणार आहेत. तब्बल 50 वर्ष राज्याच्या विधानसभेत आमदार म्हणून आपली कारकीर्द गाजवलेले ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं 30 जुलै रोजी निधन झालं. गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर शरद पवार अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकले नव्हते.

सांत्वन भेट

गणपतराव देशमुखांचं निधन झाल्यावर शरद पवार त्यांना भेटायला गेले नसल्याने ते आता सांत्वन भेटीसाठी जाणार आहेत. गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर शरद पवार अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे सांगोल्यात जाऊन शरद पवार हे गणपतराव देशमुख यांच्या घरी जातील. तिथे त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतील. गणपतराव देशमुखांच्या निधनानंतर विविध पक्षीयांनी शोक व्यक्त केला होता. पवारांनीही ट्विटरवरुन गणपतरावांना श्रद्धांजली अर्पण केली होती.

कोण होते गणपतराव देशमुख?

विधिमंडळाचे विद्यापीठ म्हणुन ओळख असलेले 94 वर्षीय गणपतराव देशमुख यांनी तब्बल 55 वर्षे सांगोला मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. तर 93 व्या वर्षी गणपतरावांना डोळे आणि कान साथ देत नसल्यामुळे निवडणूक न लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. गणपतराव देशमुख यांनी 1962 साली पहिली निवडणुक लढवली होती. त्यानंतर आजवर 11निवडणुका सांगोला विधानसभा मतदारसंघातून गणपतराव जिंकत आले आहेत.देशमुख यांची प्रकृती काही दिवसांपूर्वीच बिघडल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. गणपतरावांच्या प्रकृतीसाठी सांगोला तालुक्यातील तरुणांनी शिवलिंगाचा दुधाने अभिषेक करून आयुष्य व आरोग्य चांगले राहावे अशी प्रार्थना देखील केली होती.

पक्षांतराच्या गर्दीत पक्षनिष्ठ नेता

भारतीय जनता पक्षामध्ये सत्तरी पार केलेल्या उमेदवारांना ब्रेक दिला जात होता आणि त्यामुळे अनेक वयस्कर उमेदवारांना घरचा रस्ता धरावा लागत होती मात्र याला संपूर्ण देशात अपवाद ठरले होते, ते ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख .अनेकांची पक्षांतर होत असताना आबा मात्र पक्षनिष्ठ राहिले.वयाची नव्वदी पार केलेल्या या 94 वर्षांच्या तरुणाची क्रेझ आजपर्यन्त सांगोला मतदारसंघात पाहायला मिळत मिळालीये.गणपतरावांनी निवडणुकीतून माघार घेऊनही ‘आबासाहेब फिरसे’ असा नारा कार्यकर्तेच नाही, तर प्रत्येक मतदार देत होते. आमदार गणपतराव देशमुख यांनी तब्बल अकरा वेळा आमदार होण्याचा मान मिळवत विश्वविक्रम रचला होता.

देशमुख 1962 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. 1972 आणि 1995 चा अपवाद वगळता, ते सातत्याने विजयी झाले आहेत. गणपतरावांच्या या विजयामुळे शेतकरी कामगार पक्षाची ताकद सांगोला मतदारसंघात मोठी होती. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी दहा वेळा विजयी झाले होते. 2009 च्या निवडणुकीत विजय मिळवून करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते. 2014 मध्ये त्यांनी हा विक्रम मोडित एकमेवाद्वितीय होण्याचा मान पटकावलेला होता.

आबा…जनसामान्यांचे लाडके !

अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल 54 वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले आहे. 2012 मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सभागृहाने तसेच सरकारने त्यांचा गौरव देखिल केला होता.गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते, मात्र 1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले तेव्हा आणि 1999 मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा, अशा दोन वेळा गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता.एक पक्ष एक व्यक्ती एक मतदारसंघ म्हणून सांगोला विधानसभा मतदारसंघाला ओळखले जाते आणि याच मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख हे विजयी होत आलेले आहेत . सर्वाधिक वेळा विधानसभेत निवडून जाण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. अशा नेत्याला महाराष्ट्र मुकला आहे….!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं’, संजय राऊतांचा विरोधकांवर संताप

News Desk

सांगली-जळगावातील करेक्ट कार्यक्रम ही तर नांदी!, सेनेचा सूचक इशारा

News Desk

पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा, NDRF पथकांना सज्ज ठेवा! – मुख्यमंत्री

Aprna