HW News Marathi
महाराष्ट्र

भारतीय क्रिकेट टीमचे विमान मुंबईत लॅंड करण्यामागे शरद पवार!

मुंबई | भारताने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच भूमीत २-१ ने पराभव करुन, बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेवर नाव कोरलं. टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा अत्यंत यशस्वीपणे सांभाळलेल्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने ही ऐतिहासिक कामगिरी केली. या जबरदस्त कामगिरीनंतर अजिंक्य रहाणेचं मुंबई नगरीत जंगी स्वागत करण्यात आलं.

अजिंक्य रहाणेच्या माटुंग्यातील घराजवळ ढोल-ताशांचा गजर करण्यात आला. यावेळी अजिंक्यची सोसायटीच नव्हे तर संपूर्ण देश हे त्यांचं कुटुंब बनलं होतं. आपल्या कुटुंबातील विजयीवीर परततोय, त्याच आवेशात त्याचं स्वागत करण्यात आलं. यावेळी अजिंक्य रहाणेची चिमुकली लेक सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. बापाला पाहून चिमुकल्या अजिंक्य रहाणेला बिलगली होती.

दरम्यान, शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर टीम इंडियाचं विमान मुंबईत उतरल्याचं सांगण्यात येत आहे. बायो बबलमुळं टीम इंडियाला क्वारन्टाईन व्हावं लागणार होतं‌. त्यामुळं मुंबई एअरपोर्टवर टीम इंडियाचं विमान उतरण्याची परवानगी आधी मिळाली नव्हती. पवारांनी सूत्रं हलवल्यानंतर ही परवानगी देण्यात आली. अन्यथा टीम इंडियाचं विमान थेट चेन्नईत उतरलं असतं असं सांगण्यात आलं होतं.

दरम्यान, परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचा नियम मुंबईत आहे. बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांना कडक निर्बंध घालून सक्तीने सात ते १४ दिवस क्वारंटाईन केलं जातं. मात्र तब्बल ५ महिन्यांनी मुंबईत परतणाऱ्या आणि जगात भारताचा झेंडा डौलाने फडकवणाऱ्या टीम इंडियाच्या या योध्यांसाठी क्वारंटाईनची बाऊण्ड्री लावण्यात आली नाही. विमानतळावर केवळ RTPCR Test करुन भारतीय खेळाडूंना घरी सोडण्यात आलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सिल्लोड-सोयगाव तालुक्याच्या जलसंधारण प्रकल्पांच्या सीमा निश्चितीची  प्रक्रिया पूर्ण करावी! – अब्दुल सत्तार

Aprna

‘शाश्वत विकासासाठी स्वतःवर बंधने घाला’ | डॉ. हेमा साने

News Desk

बहुमत विकत घेऊ शकतो, भाजपचा भ्रमाचा भोपळा फुटला !

News Desk