HW News Marathi
महाराष्ट्र

बहुमत विकत घेऊ शकतो, भाजपचा भ्रमाचा भोपळा फुटला !

मुंबई | महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, असा पुनरुच्चार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. “राज्यापालांनी जी संधी भाजपला दिली आहे. त्यांचा त्यांनी याला लाभ घ्यावा,” असे राऊतांनी म्हणाले. राऊत पुढे म्हणाला की, “निकाल लागल्यानंतर अवघ्ये २४ तासात सत्ता स्थापनेचा दावा करायला व्हा होता. मात्र, १५ होऊ भाजपने सत्ता स्थापनेचा का केला नाही,” असा सवाल देखील राऊतांनी आज (१० नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

“कोणी फूटत नाही, कोणालाही फोडू शकतो, कोणालाही विकत घेऊ शक्तो, किंबहुना आम्ही बहुमत विकत घेऊ शकतो. हे जे चित्र केल्या काही वर्षापासून केंद्रात आणि राज्यामध्ये दसून येत होते, आता त्या भ्रमाचा भोपळा फुटणार आहे, तुम्ही कोणालाही विंकत घेऊ शकतो, तो काळा आता संपला,” असे म्हणत राऊतांनी भाजपला टोला लगावला. प्रत्येकजण आपल्या विचारांशी आणि भूमिकांशी प्रामाणिक आहेत, असा दावाही राऊतांनी यावेळी केला आहे.

भाजपकडे बहुमत आत्मविश्वास आहे त्यातूनच ते सांगितात की, त्यांचा मुख्यमंत्री होईल, आम्ही त्यांना आमच्याकडून शुभेच्छा देखील राऊतांनी दिल्या आहेत. राज्यपालांनी भाजपला सरकार स्थापनेची तयारी आहे की नाही याबाबत ११ नोव्हेंबर रात्री ८ वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले असल्याचीही माहिती राऊत यांनी दिली आहे. शिवसेनेच्या आमदारांची आज दुपारी १२.३० वाजता मालाडमधील रिट्रीट हॉटेलमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहतील, अशी माहिती राऊतांनी पत्रकारांना दिली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे राऊतांनी केले कौतुक

यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे राज्यासाठी योगदान असल्याचे सांगत त्यांनी या पक्षांचे कौतुक केले. राऊत पुढे म्हणाले की काँग्रेस आणि आमचे विचार वेगळे असले म्हणून आम्ही एकमेकांचे शत्रू नाही आहोत. आमचे राजकीय राजकीय मतभेद आहेत. ते कोणाचे नसतात. आम्ही अनेकदा भाजपाच्या विरोधातही मुद्दे मांडले. त्यामुळे ते आमचे शत्रू आहेत असं नाही अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. बेळगाव-कारवार सीमा प्रश्नावर काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते सेनेप्रमाणे आक्रमक भूमिका घेतात, असे म्हणत राऊतांनी काँग्रेस-राष्ट्रवादी कौतुक केले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खासदार अमोल कोल्हेंनी अमित शाहांना दिल्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा!

News Desk

नैसर्गिक आणि गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याना संपन्न करणार! – उपमुख्यमंत्री

Aprna

ठरलं! पावसाळी अधिवेशन २ दिवसांचं होणार

News Desk