HW News Marathi
महाराष्ट्र

महाड दुर्घटनेत ज्यांची भूमिका महत्त्वाची ठरली त्या NDRF ची स्थापना शरद पवारांमुळेच झाली!

मुंबई | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आत्तापर्यंत केलेल्या कामगिरीचा थोडक्यात आढवा आणि इतरांना वारंवार केलेली मदत या सर्व बाबींवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे अतिशय उत्तम वर्णन केले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी शरद पवारांचा सर्वच घटकांचा कायम आधार वाटत राहिला असेही म्हटले आहे.

काय आहे पोस्ट?

राज्यात किल्लारीचा भूकंप असो, गुजरातचा भूकंप असो किंवा मुंबईतील बॉम्बस्फोट असो. अशा प्रत्येक संकटाच्या वेळी आदरणीय पवार साहेबांनी निर्णायक भूमिका पार पाडलीय. म्हणून तर केंद्रात सरकार कोणाचंही असो प्रत्येक संकटात त्या-त्या सरकारनेही साहेबांची मदत घेतलीय, मार्गदर्शन घेतलंय. शेतकऱ्यांचे प्रश्न असो की उद्योजकांचे.. कामगार, मजूर, महिला, व्यापारी, व्यावसायिक असे सर्वांचेच प्रश्न सोडवण्यासाठी साहेबांनी नेहमी पुढाकार घेतला. किंबहुना या सर्वच घटकांना साहेबांचा नेहमी आधार वाटत आलाय. म्हणून तर साहेबांच्या भोवती सतत लोकांची गर्दी पहायला मिळते.

राज्यात सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही समोर सर्वार्थाने प्रबळ असलेल्या विरोधकांशी साहेबांनी एकाकी झुंज देऊन त्यांना सत्तेबाहेर घालवलं. हे साहेबांचं सामर्थ्य आहे आणि विरोधकही ते कबूल करताना दिसतात. आज देशात शक्तिशाली सरकार असूनही ठोस धोरण आखून लोकाभिमुख निर्णय घेतले जात नाहीत. प्रश्न सुटत नसल्याने लोकांचा आक्रोश कायम आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात प्रत्येक घटकाला वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासलंय. कधी नव्हे एवढं मोठं आर्थिक संकट आपल्यापुढं उभं ठाकलंय. बेरोजगारी झपाट्याने वाढतेय. युवांना निराशेने ग्रासलंय. कोरोना असतानाही परीक्षा घेऊन मुलांच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न होतोय. पालकांना टेन्शन आहे. दोन वेळची चूल कशी पेटवायची असा प्रश्न लाखो कुटुंबांना भेडसावतोय. या सर्व घटकांचे प्रश्न सरकारपर्यंत पोचवणं, त्यासाठी मार्गदर्शन करणं आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची क्षमता, अभ्यास, चिकाटी, समर्पण वृत्ती, ताकद अन सर्वपक्षीय संबंध असलेले एकमेव नेते म्हणून साहेब आपल्याकडं पाहिलं जातं.

आपला झंझावात आम्ही आजही पाहतोय. आज कोरोनाच्या काळातही तुम्ही राज्यभर दौरे करून लोकांना भेटत आहात, त्यांचे प्रश्न समजून घेत आहात आणि ते सोडवण्यासाठी सरकारला मार्गदर्शन करत आहात. वेगवेगळ्या वयोगटातील नेत्यांना, वेगवेगळ्या पक्षांना सोबत घेण्याची, त्यांना सांभाळून घेण्याची आपली हातोटी आहे. भल्याभल्यांना अशक्य वाटणारा आघाडी सरकारचा प्रयोग लोकांच्या हितासाठी आपण राज्यात यशस्वी करुन दाखवला. या धक्क्यातून अनेक नेते अजूनही सावरलेले नाहीत. आपला दांडगा अनुभव पाहता लोकांच्या हिताच्या अनेक गोष्टी आपण अधिकारवाणीने सरकारकडून करून घेऊ शकता, असा सर्वांना विश्वास आहे.

दोन दिवसांपूर्वी महाड इथं इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या ठिकाणी एनडीआरएफ करत असलेलं बचाव कार्य आपण पाहतोय. महापूर, भूकंप, इमारत दुर्घटना किंवा इतर प्रत्येक नैसर्गिक संकटात एनडीआरएफची भूमिका महत्त्वाची ठरतेय. हे यासाठी सांगतोय की या एनडीआरएफची स्थापना साहेब आपल्यामुळंच झाली.

आज अनंत अडचणी आहेत. विरोधी पक्षाकडून सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले जात आहेत आणि यापुढंही मांडले जातील. पण ते सोडवण्यासाठी सत्ताधाऱ्यांवर दबावही निर्माण करावा लागतो. असा दबाव निर्माण करण्यासाठी विरोधकांना एकत्रित आणून एक मोठी ताकद उभी करण्याची आपली क्षमता आहे. विरोधी पक्षातील आश्वासक नेता म्हणून आपल्याकडं पाहिलं जातं. म्हणून विरोधकांची एकत्रित मोट बांधण्यासाठी प्रमुख भूमिका आपण घेऊ शकता आणि आज त्याचीच सर्वाधिक गरज आहे.

अशा प्रकारे मोट बांधूनच आपण प्रबळ सत्ताधाऱ्यांशी लढू शकतो, असं एक कार्यकर्ता म्हणून माझ्यासारख्याला वाटतं. म्हणून देशपातळीवर सामान्य जनतेचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी विरोधकांना एकत्रित आणण्याचं सुकाणू आपण हाती घेतलं तर सरकारवर अंकुश राहीलच शिवाय सर्वसामान्यांचे प्रश्नही सुटतील.

https://www.facebook.com/220852055045211/posts/998948780568864/

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टी-१ वाघिणीच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांमध्ये जल्लोषाचे वातारण

swarit

बीडमधील कायदा व सुव्यवस्थेबाबत लक्षवेधी मांडणारे आमदार संदीप क्षीरसागर यांचाच अवैध धंद्यांमध्ये छुपा सहभाग

Aprna

पुनर्विकासासाठी  म्हाडा सर्वतोपरी प्रयत्नशील! –  जितेंद्र आव्हाड

Aprna