मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना आज ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. शरद पवारांवर २ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. ११ एप्रिलला शरद पवार यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
१२ एप्रिलला त्यांच्या पित्ताशयावर लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन दिवस हॉस्पिटलमध्ये विश्रांती घेतल्यानंतर आज शरद पवार यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची तब्येत बरी आहे. देशभरातील जनतेने, चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या शिवाय दिलेल्या पाठिंब्याबद्दल नवाब मलिक यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
Update
Our party President Sharad Pawar saheb will be discharged from hospital today and is in good health.
Thank you everyone for your good wishes and support for Saheb.— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) April 15, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.