HW News Marathi
महाराष्ट्र

धनंजय मुंडेंबाबत आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता, रेणू शर्मा प्रकरणावर पवारांची प्रतिक्रिया

कोल्हापूर | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेने आपली तक्रार मागे घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. मुंडे प्रकरणात चौकशी करावी हा आमचा निष्कर्ष बरोबर होता, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ते कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते.

पोलिस खाते त्यांचं काम करत आहे. त्यांचा ज्यावेळी निष्कर्ष येईल त्यावेळी भाष्य करेन, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणात अडकल्यामुळे भाजपने मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. त्यानंतर शरद पवारांनी मुंडे यांच्या बाजूने उभे रहात मुंडेंवरील आरोपांच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. कोणावरही अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कुणावरही आरोप करायचे आणि सत्तेपासून दूर व्हायचे, अशी प्रथा पडू शकते, असे शरद पवार यांनी म्हटले होते.

महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण आज (२२ जानेवारी) पवार यांच्या हस्ते होणार आहे. या निमित्ताने पवार आजपासून दोन दिवस कोल्हापूर दौर्‍यावर आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ईडीचा सर्वात मोाठा घोटाळा बाहेर काढणार; संजय राऊतांचा इशारा

Manasi Devkar

नवी मुंबईतील ए.पी.एम.सी मार्केटही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद

swarit

परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं ! उच्च न्यायालयात जाण्याच्या सूचना…

News Desk