HW News Marathi
देश / विदेश

शरद पवारांसह विरोधीपक्षातील दिग्गजांचे शिष्टमंडळ आज राष्ट्रपतींची भेट घेणार

नवी दिल्ली | माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज (९ डिसेंबर) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. शरद पवार यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माकप नेते सीताराम येचुरी, भाकप नेते डी. राजा, द्रमुक नेते टीकेएस एलानगोवन या विरोधीपक्षातील दिग्गजांचे शिष्टमंडळ संध्याकाळी पाच वाजता राष्ट्रपतींची भेट घेणार आहे.

यावेळी देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर राष्ट्रपतींसोबत चर्चा होणार आहे. कृषी कायदे रद्द करण्यासाठी सरकारला निर्देशित करण्याबाबत हस्तक्षेप करावा, अशी मागणी हे नेते करणार आहेत. त्यामूळे या बैठकीत काय होणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना आमचा सरसकट विरोध नाही. मात्र शेतकऱ्यांच्या मालाला १०० टक्के किंमत मिळाली पाहिजे. त्याबाबत बंधन असलं पाहिजे. नव्या कायद्यात सक्तीचा अभाव आहे. त्याबाबत उत्तर भारतातील शेतकऱ्यांच्या भावना तीव्र असल्याचं, मत शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं.

महाराष्ट्रातील कृषी बाजार समितीची शेती आणि उत्तर भारतातील शेती यात फरक आहे. आपल्याकडे बाजार समित्यांची रचना साधारणपणे शेतकऱ्यांना मान्य आहे. आम्ही लोकांनीच विचारविनिमय केला. त्यात शेतकऱ्यांना काही स्वातंत्र्य देण्यात यावे, अशी सूचना समोर आली.

त्याबाबत महाराष्ट्राने यापूर्वी निर्णय घेतला आहे. याचा अर्थ असा की कृषी बाजार समिती कायम आहे. शेतकऱ्यांना या ठिकाणी येऊन शेतमाल विक्रीचा अधिकार आहे. तिथे माल विकताना त्याची किंमत त्याच्या पदरात पडेल, यासाठी खरेदीदारावर बंधनं आजही इथं कायम आहेत, असंही पवार म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तिहेरी तलाक विधेयकास मंजुरी

News Desk

भारत-रशिया रायफल्स करार, अमेठीत उभारणार रायफल्सचा कारखाना

News Desk

फेसबुकडून जुन्या आठवणींना उजाळा देणारे नवे फीचर लॉन्च

News Desk