HW News Marathi
महाराष्ट्र

कृषी कायद्याविरोधात बातचीत करण्यासाठी शरद पवार थेट राष्ट्रपतींना भेटणार

मुंबई | देशात सध्या शेतकरी वर्ग कृषी कायद्याविरोधात प्रचंड आक्रमक झालेला दिसत आहे. गेल्या १० दिवसांपासुन शेतकऱ्यांचे केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. यात देशभरातील जवळपास ४० शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत. आता माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी कायद्यांविरुद्ध आवाज उठवण्याचा शड्डू ठोकला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. ९ डिसेंबरला संध्याकाळी ५ वाजता ही भेट होणार असल्याची माहिती मिळत आहे. यावेळी पवार यांच्यासोबत अन्य राजकीय पक्षांचे काही नेते उपस्थित असणार आहेत. दरम्यान, राज्यमंत्री बच्चु कडू देखील चलो दिल्लीचा नारा देत बाईकवरून दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेेत. त्यामूळे शरद पवार आणि राष्ट्रपती यांच्या भेटीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांना शरद पवार न्याय मिळवून देणार का हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आजच्या वटपौर्णिमा सणानिमित्ताने जाणून घ्या… व्रतकथा, महत्व अन् मुहूर्त

News Desk

आजपासून 9 मेपर्यंत औरंगबादमध्ये जमावबंदी लागू, पोलिसांचे आदेश

Aprna

मोठी बातमी ! पुण्यात रात्रीची संचारबंदी,रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंतची संचारबंदी…

News Desk