HW News Marathi
महाराष्ट्र

“आज ‘स्पेशल 26’चा धमाका”, नवाब मलिकांना ‘एनसीबी’च्याच अधिकाऱ्याकडून आला लिफाफा

मुंबई। ड्रग्ज पार्टी प्रकरण आणि आर्यन खानवरील कारवाईवरून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर आज पुन्हा एकदा मलिक यांनी एनसीबीच्या अधिकाऱ्यांने लिफाफा पाठवल्याचा दावा करत ‘स्पेशल 26’ उघड करणार असल्याचं सांगत खळबळ उडवून दिली आहे. क्रूझशिप ड्रग्ज पार्टी प्रकरण दिवसेंदिवस विस्तारत चाललं असून, दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहे. अमली पदार्थविरोधी कारवायांमुळे चर्चेत असलेले एनसीबीचे अधिकारी आर्यन खान प्रकरणात वादात सापडले असून, नवाब मलिक यांनी त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

लिफाफ्याचा फोटो शेअर केला

वानखेडे यांच्या भूमिकेबद्दल नवाब मलिक यांच्या कडून वारंवार शंका उपस्थित करत आरोप करत असलेल्या नवाब मलिक यांनी आज 26 ऑक्टोबर दोन ट्वीट केले आहेत. नवाब मलिक यांनी पहिल्या ट्वीटमध्ये एक लिफाफ्याचा फोटो शेअर केला आहे. ज्यावर मलिक यांचं नाव आणि पत्ता आहे. या लिफाफ्याबद्दल माहिती देताना मलिक यांनी म्हटलं आहे की, ‘एनसीबीच्या अज्ञात अधिकाऱ्याकडून आपल्याला हा लिफाफा प्राप्त झाला आहे. यातील माहिती मी लवकरच ट्विटरवर जाहीर करणार आहे’, अशी माहिती मलिक यांनी दिली आहे.

त्यानंतर मात्र नवाब मलिक यांनी आणखी ट्वीट केलं आहे. ज्यात ‘सगळ्यांना सुप्रभात, मी लवकरच स्पेशल 26 बद्दल माहिती देणार आहे’, असं म्हटलेलं आहे. मलिक यांच्या दोन्ही ट्वीटमुळे सस्पेन्स वाढला असून, मलिक नेमकं काय सांगणार आहेत, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे भूमिपूजन उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार, राज ठाकरेंना निमंत्रण नाही?

News Desk

‘मसाला किंग’ MDH मसाल्याचे चेअरमन महाशय धरमपाल गुलाटी यांचे निधन

News Desk

BSNLच्या 4G अपग्रेडेशनसाठी काढलेल्या निविदा दूरसंचार मंत्रालयाने केल्या रद्द

News Desk