नवी दिल्ली | भारताच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीवरून अभिनेते शत्रूघ्न सिन्हा यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कृपया या परिस्थितीसाठी आता देवाला जबाबदार धरु नका, असा टोला शत्रूघ्न सिन्हा यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. भारताचा GDP घसरल्याची बातमी ऐकली. ही खूपच निराशाजनक बातमी आहे, असं शत्रूघ्न सिन्हा यांनी म्हटलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे.
Just as we heard the very discouraging & heartbreaking news about the GDP fall @-23% .. unfortunately, it has been the worst fall in the last 40yrs. Hope, wish & pray, that this too won't be attributed as the 'Act of God'! In all this comes this very heartwarming, inspiring &
— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) September 1, 2020
गेल्या ४० वर्षांतील ही सर्वात मोठी घसरण आहे. कृपा करुन या परिस्थितीसाठी देवाला जबाबदार धरु नका, असं ट्विट शत्रूघ्न सिन्हा यांनी केलं आहे. दरम्यान, भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीत एप्रिल ते जून दरम्यान तब्बल २३.९ टक्क्यांनी घट झाली आहे. यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर टीका सुरू केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.