HW News Marathi
महाराष्ट्र

मांस खाणाऱ्यांच्या हाताने मंदिरे का उघडू? मंदिरांवरून खैरे-जलील वाद शिगेला…

मुंबई | राज्यात सध्या धार्मिक स्थळे सुरु करण्यावरुन राजकारणावर सुरुवात झाली आहे. आज (१ सप्टेंबर) एमआयएमचे नेते इम्तीयाज जलील यांनी आज मंदिरे उघडू आणि उद्या मशीद उघडू असा इशारा ठाकरे सरकारला दिला होता. त्यावरुन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि इम्तीयाज जलील यांच्यात वाद निर्माण झाला आहे. चंद्रकांत खैरे असं म्हणाले की, जलील यांना आमच्या मंदिराला आम्ही हात लावू देणार नाही. यावर जलील असे म्हणाले की, मी हात लावणार नाही, माझ्यासोबत माझे हिंदू बांधव असतील. तसेच, खैरेंनी असे समजू नये की सर्व हिंदू बांधव तुमच्या सोबत आहेत. अशा शब्दांत त्यांनी खैरेंना उत्तर दिले.

काय म्हणाले होते चंद्रकांत खैरे ?

आमची हिंदू मंदिरे उघडण्यास आम्ही समर्थ आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ५-६ दिवसांत मंदिरांबाबतचा निर्णय देणार आहेत. हळूहळू लॉकडाऊन शिथिल होत आहे. आणि तो मांस खाणारा माणूस, त्याच्या हाताने आम्ही आमची मंदिरे उघडू? त्याच्या हाताने उघडून मंदिरे भ्रष्ट करायची का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. दरम्यान, राज्यात सध्या सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षात मंदिर सुरु करण्याबाबत राजकारण शिगेला पोहोचले आहे. आणि वारंवार विरोधी पक्षाकडून आंदोलनाची इशारा दिला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

असाल तेथेच थांबून राहा, आपल्या निवास व भोजनाची हमी आमची !

News Desk

कोरोनाकाळात महाराष्ट्रासोबत लसच नाही तर इतर वैद्यकीय उपकरण वाटपातही दुजाभाव – पृथ्वीराज चव्हाण

News Desk

महाराष्ट्रातील गोमांस बंदीवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालय तयार

News Desk