HW News Marathi
महाराष्ट्र

गोकुळमध्ये सत्ताधारी गटाच्या शौमिका महाडिक विजयी!

कोल्हापूर | संपुर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या गोकुळच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. जवळजवळ २५०० कोटींची उलाढाल असणाऱ्या गोकुळची निवडणुक यंदा अधिक चर्चेत आहे कारण महाविकासआघाडीचे आमदार,खासदार एकत्रितपणे कामाला लागले आहेत.दुसरीकडे भाजपने सुद्धा आपल्या सगळ्या नेत्यांना कामाला लावले आहे.

सतेज पाटील विरूद्ध महादेव महाडिक असा सामना असताना गोकुळ दूधसंघ कोणाच्या हातात जाणार याचा निकाल आज लागणार आहे.मतमोजणीला सुरूवात झाली आहे आणि पहिले काही निकाल हाती आले आहेत.एकीकडे विरोधी गटाचे ३ शिलेदार विजयी झाल्यानंतर सत्ताधारी गटाच्या शौमिका महाडिक या विजयी झाल्या आहेत.

शौमिका महाडिक या महादेव महाडिक यांच्या सुन आणि माजी आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी आहेत.त्या राजकीय घडामोडींबाबत सातत्याने भाष्य करत असतात. दुसरीकडे विरोधी गटातील माजी आमदार सुजीत मिणचेकर आणि अमर पाटील यांनी बाजी मारली आहे. भटक्या विमुक्त प्रवर्गातील बयाजी शेळके हे सुद्धा विजयी झाले आहेत. आतापर्यंत सतेज पाटील गटाचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवेंद्र फडणवीस जाणार शरद पवारांच्या भेटीला…नेमकं कारण काय ?

News Desk

शिवसैनिकांचा मला जिवे मारण्याचा प्रयत्न!, किरीट सोमय्यांचा आरोप

Aprna

१२वीच्या परीक्षेसाठी आदल्या दिवसापर्यंत अर्ज भरण्याची मुभा, राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय

News Desk