HW News Marathi
महाराष्ट्र

कोल्हापूरातील ‘या’ अपक्ष आमदाराचा शिवसेनेला पाठिंबा

मुंबई | विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अवघे १३ दिवस झाले तरी देखील राज्यात सरकार स्थापन झाले नाही. शिवसेना- भाजपमध्ये मुख्यमंत्री आणि सत्तेचे समान वाटपावरून कलगीतुरा रंगला आहे. बहुमतचा आकडा काढण्यासाठी दोन्ही पक्षाकडून अपक्ष आमदरांना आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात दोन्ही पक्षांना अपक्ष आमदारांना आपल्या बाजुला करण्यात बहुतांश यश देखली आले आहे.

अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सोमवारी (४ नोव्हेंबर) रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेऊन शिवसेनेला आपला पाठिंबा दर्शवला. यावेळी शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. त्यामुळे आता शिवसेनेचे संख्याबळ ६४ वर पोहचले आहे.

राजेंद्र पाटील यड्रावकर हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेले आहेत. आघाडीने उमेदवारी डावल्यानंतर राजेंद्र पाटील यड्रावकर अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरले. त्यांनी तब्बल ९० हजार ३८ मते मिळवत शिवसेनेचे विद्यमान आमदार उल्हास पाटील यांचा २७ हजार ८२४ मतांनी पराभव केला आहे.

शिवसेनेला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार

  • मंजुळा गावित (अपक्ष) – साक्री मतदारसंघ, धुळे
  • चंद्रकांत पाटील (अपक्ष) – मुक्ताईनगर, जळगाव
  • बच्चू कडू (प्रहार जनशक्ती पार्टी) – अचलपूर, अमरावती
  • राजकुमार पटेल (प्रहार जनशक्ती पार्टी) – मेळघाट, अमरावती
  • आशिष जैस्वाल (अपक्ष) – रामटेक, नागपूर
  • नरेंद्र भोंडेकर (अपक्ष) – भंडारा, भंडारा
  • शंकरराव गडाख (क्रांतीकारी शेतकरी पक्ष) – नेवासा, अहमदनगर
  • राजेंद्र पाटील (अपक्ष) – शिरोळ, कोल्हापूर

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकसेवा हेच खरे अध्यात्म असल्याची शिकवण गुरुमाऊलींच्या विचारातून मिळते! -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात विनयभंग, तर महापौर म्हणतात….!

News Desk

“कोणताही शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंची खोटी शपथ घेणार नाही”

News Desk